आरोग्य टिप्स - भेंडीमध्ये ( Bhindi Bhaj) जीवनसत्त्वे , कॅल्शियम , फॉलिक अॅसिड , फायबर आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक आढळतात , जे आरोग्यास...
आरोग्य
टिप्स - भेंडीमध्ये (Bhindi
Bhaj) जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फॉलिक अॅसिड, फायबर आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक
आढळतात, जे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. भेंडी ही भाजी
मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. जाणून घ्या मधुमेहाच्या
रुग्णांसाठी भेंडी खाणे फायदेशीर का आहे याविषयी माहिती आणि भेंडी खाण्याचे इतर
फायदे –
भेंडी भाजीमध्ये कॅलरी आणि फॅट या दोन्हीचे
प्रमाण कमी असते. भेंडीमध्ये असलेले अघुलनशील आहारातील फायबर, हा मधुमेहासाठी एक
चांगला स्रोत आहे, ज्यामुळे शरीरातील साखर बाहेर पडण्यास
उशीर होतो आणि भूक देखील नियंत्रित होते, ज्यामुळे शरीरातील
कॅलरीजचा भार कमी होतो.
भेंडी
आतड्यांमधून साखरेचे शोषण नियंत्रित करते. फायबरसोबत भेंडीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी6
आणि फोलेट मोठ्या प्रमाणात असतात. भेंडीमधे असणारे हे सर्व घटक
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. तर दूसरीकडे, भेंडीमध्ये द्रवपदार्थ चांगल्या प्रमाणात असतात आणि कॅलरीज देखील कमी
असतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास अत्यंत मदत होते.
पचनशक्ती चांगली राहते
ज्या लोकांची पचनशक्ती कमजोर आहे अशा लोकांनी भेंडी जरूर खा. कारण भेंडी कमकुवत पचनसंस्था मजबूत करण्याचे काम करते.
पचनसंस्थेसाठी गुणकारी
भेंडी भरपूर फायबर असणारी भाजी आहे. फायबर पचन तंत्रासाठी फायदेशीर असतो. यामुळे पोटफुगी, कब्ज, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते
भेंडीत व्हिटॅमिन-सी असल्यामुळे एंटीआक्सिडेंटने भरपूर असते. ज्यामुळे
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते.
COMMENTS