लोणीकंद परिसरातील 'सेक्स रॅकेट'चा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, बांगलादेशी युवतीसह ६ जणींची सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आ...
लोणीकंद परिसरातील 'सेक्स रॅकेट'चा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, बांगलादेशी युवतीसह ६ जणींची सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
युवतींना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करुन घेणार्या टोळीचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दापाश केला आहे.
लोणीकंदमधील हॉटेल मनोरा येथे पथकाने छापा टाकून ६ युवतींची सुटका केली. याप्रकरणी दोघा मॅनेजरांना अटक केली आहे. प्रज्योत हिरीआण्णा हेगडे (वय २७, रा. पेरणे फाटा) आणि गिरीश शाम शेट्टी (वय २९, रा. पेरणे फाटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
लोणीकंदमधीस हॉटेल मनोरा येथे मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. सामाजिक सुरक्षा विभागाने तेथे बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. हॉटेलमध्ये ६ युवतींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांना दोघा मॅनेजरांना अटक केली. संबंधित कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, एपीआय अश्विनी पाटील, अजय राणे, मनीषा पुकाळे, हणमंत कांबळे, किशोर भुजबळ, इम्रान नदाफ, रेश्मा कंक यांनी केली आहे.
COMMENTS