दिल्ली -जुन्या संसद भवनातून आता नव्या संसद भवनात सर्व कारभार स्थलांतरीत करण्यात आला असून त्यापूर्वी जुन्या संसदेतील सेन्ट्रल हॉलमधून आज...
दिल्ली -जुन्या संसद भवनातून आता नव्या संसद भवनात सर्व कारभार स्थलांतरीत करण्यात आला असून त्यापूर्वी जुन्या संसदेतील सेन्ट्रल हॉलमधून आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करतांना जुन्या संसदेचं नाव ‘ संविधान सदन’ म्हणून जाहीर केले.
पुढे बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की जुनं संसद भवन ‘संविधान सदन’ म्हणून ओळखलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करतो “आज आपण या संसदेला निरोप देऊन नव्या संसद भवनात प्रवेश करणार आहोत. गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण या नव्या भवनात जात आहोत हे शुभ आहे. पण मी दोन्ही सभागृहातील नेत्यांना विनंती करतो, त्यांच्या समोर एक विचार ठेवतो.
मी आशा करतो की आपण दोघांनी मिळून या विचारावर कुठेही मंथन करुन यावर निर्णय घेऊ शकता. माझी सूचना आहे की, जर आपण नव्या संसद भवनात जात आहोत तर जुन्या संसदेची प्रतिष्ठा कधीही कमी होता कामा नये.
या भवनाला केवळ जुनी संसद म्हणून सोडून देऊ, असं होता कामा नये. त्यामुळं माझी प्रार्थना आहे की, जर तुम्ही दोघांनी भविष्यात याला सहमती दिली तर या जुन्या भवनाला ‘संविधान सदन’ म्हणून ओळखलं जावं.
COMMENTS