रविवार दि १० सप्टेंबर २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय ओतूर येथील मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सभागृह येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत...
रविवार दि १० सप्टेंबर २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय ओतूर येथील मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सभागृह येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ सलग्न पुणे व सातारा श्रमिक संघ यांचे व ग्रामपंचायत ओतूर यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कर्मचारी जुन्नर तालुका नवनिर्वाचित पदाधिकारी निवड नामफलकाचे उदघाट्न व स्नेहमेळावा ओतूर ग्रामपंचायतचे सरपंच श्री प्रशांतभाऊ डुंबरे यांचे शुभहस्ते व श्री प्रेमानंद अस्वार उपसरपंच आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच धोलवड गावचे नवनिर्वाचित सरपंच श्री वैभव नलावडे ओतूर गावचे ग्रामविकास अधिकारी श्री बाळासो वनघरे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री जे एस आस्वार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे कॉ ज्ञानोबा घोणे, पुणे विभागीय अध्यक्ष श्री सुभाष तुळवे, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अशोकराव गायकवाड, उपाध्यक्ष श्री अर्जुन रांजने/श्री वसंत शिंदे यांचे प्रमुख उपस्थित सपन्न झाला. यावेळी पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील तालुका अध्यक्ष उपस्थित होते. जुन्नर तालुका नवनिर्वाचित अध्यक्ष श्री शंकर रसाळ उपाध्यक्ष श्री दत्तात्रय विरणक /श्री अमोल घोलप सचीव श्री अर्जुन कदम व कार्यकारिणी तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना कॉ घोणे यांनी केली प्रमुख उपस्थितांचे स्वागत जिल्हा अध्यक्ष श्री अशोकराव गायकवाड यांनी केले, सरपंच श्री प्रशांत डुंबरे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना म्हणाले ग्रामपंचायत कर्मचारी हेच ग्रामपंचायतचा आत्मा आहे.
सर्व कर्मचारी आपली जबाबदारीने काम करत असतो त्यांच्यावर गावची स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, आरोग्य, करवसुली, इनामे इतबारीने पार पाडत असतो त्यांचे काही अडचणी असतील त्या दूर करण्याची हमी यावेळी देण्यात आली. श्री जे एस आस्वार यांनी आपले प्रशासन सेवेतील अनेक प्रसंग ग्रामपंचायत कर्मचारी यांचे अडचणी यावर मार्गदर्शन केले. सदरचे कार्यक्रमा साठी ग्रामपंचायत कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते, आभार पुणे विभागीय अध्यक्ष श्री सुभाष तुळवे यांनी मानले. स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
COMMENTS