आरोग्य टिप्स : पिचमध्ये (Peach) जीवनसत्त्व ‘अ’, ‘ई’ व ‘के’, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असे पौष्टिक घटक असतात. जाणून घ्या ...
आरोग्य टिप्स : पिचमध्ये (Peach) जीवनसत्त्व ‘अ’, ‘ई’ व ‘के’, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असे पौष्टिक घटक असतात. जाणून घ्या पीच खाण्याचे फायदे –
रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते
पीच शरीरात अँटी-ऑक्सिडेंट म्हणून काम करते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. पीच खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते
पीचमध्ये बीटा कॅरोटीन असते, जे शरीरात व्हिटॅमिन ए बनवते. डोळयांतील पडदा निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए खूप महत्वाचे आहे. पीच खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. पिचमुळे रातआंधळेपणा, मोतीबिंदू, नजर कमी होणं या प्रकारच्या सर्व तक्रारी कमी होण्यास मदत होते.
पचनक्रिया सुरळीत राहते
पिचमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. फायबर पचनास मदत करते, नियमित आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते.
त्वचेसाठी गुणकारी
पीचचे सेवन केल्याने त्वचेचा रंग उजळतो, त्वचा अधिक तरुण दिसते.
शरीर हायड्रेट राहते
पीचमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीर हायड्रेट राहते. यामुळे पचन, रक्ताभिसरण आणि तापमान नियमन व्यवस्थित राहते.
साखरेचं प्रमाण कमी
पीच हे फळ मधुमेहींना खाण्यासाठी योग्य आहे. कारण यात साखरेचं प्रमाण कमी आहे.
COMMENTS