भारतीय इस्त्रोच्या वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयाण -३ चे यशस्वी लँडिंग करत २३ आँगस्ट २०३३ रोजी इस्त्रोने ...
भारतीय इस्त्रोच्या वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयाण -३ चे यशस्वी लँडिंग करत २३ आँगस्ट २०३३ रोजी इस्त्रोने रचना नवा इतिहास
चंद्रावरही विजयी विश्व तिरंगा
डौलाने लहरू लागला
या ऐतिहासिक घटनेने सर्व भारतीयांच्या माना गौरवाने डोलू लागल्या ! खरचं किती हे अविस्मरणीय सुर्वण क्षण...
याच सुखद क्षणाचा जल्लोष साजरा करण्यासाठी, भारतीय इस्त्रोच्या वैज्ञानिकांचा काव्यरूपी गौरव करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी
D.B.A अर्थातचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत(रजि.) या संस्थेच्या वतीने
४१ वे ऑनलाईन कविसंमेलन
जेष्ठ गझलकार प्रा.डॉ. अनिल साबळे(अंधकवी) मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या जलोषात संपन्न झाले. यावेळी महाड, रायगड येथील
प्रतिभावंत कवयित्री व उत्तम निवेदिका मा.उषा खोपडे यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैली मध्ये कविसंमेलनाची सुरुवात केली. त्यानंतर D.B.A.च्या सहसंस्थापिका व संपादिका मा.भावना खोब्रागडे यांनी
"इस्रोच्या नवं विश्वपर्वाने
स्पर्शूनी चंद्रास.......
अवकाशातुनी यंत्रनेने
रचला नवा इतिहास....
हे आपले स्वरचित गौरवशाली वैज्ञानिक गीत सादरीकरण करून कवी मनामध्ये नवचैतन्य निर्माण केले. आणि वातावरण प्रफुल्लित झाले.
यानंतर पुणे येथील प्रा.सतिश शिंदे यांनी डि. बी.ए.ची वाटचाल आणि कविसंमेलनाचा उद्देश तसेच
चंद्रयान -३ बद्दल विस्तृत स्वरूपात माहिती आपल्या प्रस्तावनेतून सांगीतली. तसेच मा.मनोज जाधव संस्थापक- अध्यक्ष यांनी एका आगळ्यावेगळ्या व नाविन्यपूर्ण कविसंमेलना मध्ये सहभागी झालेल्या सर्व कविना शुभेच्छा दिल्या. सदर कविसंमेलना मध्ये अतिशय मार्मिक, तितक्याच चंद्रयान -३ चा गौरवशाली इतिहासावर बहारदार कविता सादरीकरण करून कविसंमेलनाची उत्कंठा वाढवली. या मध्ये २५ कविना आपल्या कविता सादरीकरण केल्या. त्यानंतर कविसंमेलनाचे अध्यक्ष गझलकार प्रा.डॉ. अनिल साबळे
यांनी उत्तम मार्गदर्शन केले.खरतरं कविता कशी लिहावी, ती कोणत्या पध्दतीने सादरीकरण करावी... त्याचे प्रत्येक कविने आत्मभान जपणं फार जरूरीचे आहे. या बाबत मार्गदर्शन करून आपल्या अध्यक्षणिय भाषणाची सांगता केली. सदर कविसंमेलनाला नागपूर विभागीय अध्यक्ष मा.सोपानदेव मशाखेत्री,पुणे विभागीय अध्यक्ष
मा.अशोक पवार उपस्थित होते. अखेर पुणे येधील नवोदित कवयित्री मा.प्रतिभा किर्तीकर्वे यांनी सर्वच उपस्थितीतांचे आभार व्यक्त करून ४१ व्या ऑनलाईन कविसंमेलनाचे आभार व्यक्त केले. या कविसंमेलनामध्य़े २५ कवींनी सहभाग नोंदवला. एक ऐतिहासिक व नाविन्यपूर्ण कविसंमेलन D.B.A. ने राबवून खऱ्या अर्थानं चार चांद लावले. इस्त्रोच्या सर्वच वैज्ञानिकांचे D.B.A.परिवार तर्फे हार्दिक ! हार्दिक !! अभिनंदन !
शब्दांकन व आयोजक
मा.मनोज जाधव सर
संस्थापक - अध्यक्ष
मा.भावना खोब्रागडे
सहसंस्थापिका व संपादिका
आणि D.B.A. परिवार
जयभीम ! जयभारत ! जय विज्ञान!!
COMMENTS