रत्नागिरी महाराष्ट्र - ज्यांनी आपल्या प्रगल्भ गीत लेखणीच्या माध्यमातून बुध्द , शिवराय , फुले , शाहू , आंबेडकर , माता रमाई यांचे क्रांतिक...
रत्नागिरी महाराष्ट्र - ज्यांनी आपल्या
प्रगल्भ गीत लेखणीच्या माध्यमातून बुध्द,
शिवराय,
फुले,शाहू,
आंबेडकर
,माता रमाई यांचे क्रांतिकारी विचार संपूर्ण जगभर पोहचविले. ते बुलंद
लेखणीचे बादशहा. ज्यांनी १५००० हजारांहून अनेक गीते लिहून स्वतः गाऊन एक ऐतिहासिक
क्रांती केली. ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभेच्या भाषणापुर्वी गीत
गायनाची संधी प्राप्त होत होती. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक
महाकवी, युगकवी, लोकशाहिर, साहित्यरत्न अशा अनेक नावाने जगविख्यात असणारे महाराष्ट्राचे लाडके
व्यक्तिमत्त्व ! म्हणजे आदरणीय स्मृतीशेष वामनदादा कर्डक होय ! त्यांचा
१५ ऑगस्ट हा जन्म दिवस.
या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांना
काव्यरूपी अभिवादन करण्यासाठी ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर
कविसंमेलना मध्ये ४५ कविनी आपल्या स्व:लिखित कविता सादरीकरण केल्या तर...काही
कविनी वामनदादा कर्डक यांची गीते सादरीकरण केली. सर्व प्रथम सांगली जिल्हाच्या D.B.A.च्या
कार्याध्यक्ष उत्तम निवेदिका सुरेखा कांबळे यांनी कार्यक्रमाची सुरूवात केली.
त्यानंतर नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा.श्रीधर महिरे यांनी कविसंमेलनाचे
प्रास्ताविक केले. त्यामध्ये D.B.A.च्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला
तर..युगकवी वामनदादा कर्डक यांच्या संपूर्ण जीवनाचा लेखाजोखा आणि
आंबेडकरी चळवळीतील एक कवी म्हणून त्यांचे योगदान तसेच त्यांच्या अनेक गीतांचे शब्द
विवेचन करून समजावून सांगितले.
त्यानंतर डि. बी. ए. च्या सहसंस्थापिका
व संपादिका
मा.भावना खोब्रागडे यांनी
काल मुजरेच केले रे,
माझ्या मेलेल्या बापाने,
आज मुजरे मला करती त्या
भीमाच्या प्रतापाने आपल्या सुमधूर आवाजात वामनदादा कर्डक यांनी लिहिलेले गीत
सादरीकरण करून कविसंमेलनाची रंजकता वाढविली. त्यानंतर खऱ्या अर्थानं कविसंमेलनाला सुरुवात झाली.
सदर कविसंमेलना मध्ये एकापेक्षा एक सरस
कविता आणि युगकवी वामनदादा कर्डक यांच्या गीताची अक्षरशः बरसात झाली. एक
नाविन्यपूर्ण आणि ऐतिहासिक ऑनलाईन कविसंमेलनाने मनात नवचैतन्य निर्माण झालं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मा.युयुत्यु आर्ते
(देवरूख) यांनी डि.बी.ए.च्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. तसेच युगकवी वामनदादा
कर्डक यांनी लिहिलेली गीते म्हणजे स्फूर्ती व प्रेरणा होय यावर भाष्यकरून
कविसंमेलनाला शुभेच्छा दिल्या. तर मनोज जाधव सर यांनी कविसंमेलनाध्यक्ष मा.जानराव
यु. एफ. यांचा परिचय करून दिला. सदर कविसंमेलना मध्ये ४५ कविनी आपल्या बहारदार
कविता सादर केल्या. त्यानंतर कविसंमेलनाध्यक्ष
मा.जानराव यू एफ यांनी सर्व कविना
मार्गदर्शन करून कविना शुभेच्छा दिल्या. मा.सुनंदा
पवार नाशिक जिल्हा सचिव यांनी उपस्थिताचे आभार मानून कविसंमेलनाचा समारोप केला.
सदर कार्यक्रमाला मा.जनार्दन जाधव कोकण
विभागीय अध्यक्ष, मा.अशोक पवार पुणे विभागीय अध्यक्ष तसेच सोपानदेव मशाखेत्री नागपूर
वि. अध्यक्ष यांची उपस्थिती लक्षवेधी होती.
एक नाविन्यपूर्ण व ऐतिहासिक
४० व्या ऑनलाईन कविसंमेलनाने युगकवी
वामनदादा कर्डक यांना अभिवादन करण्यात आले.
आयोजक
मा.मनोज जाधव सर
संस्थापक - अध्यक्ष
मा.भावना खोब्रागडे
सहसंस्थापिका व संपादिका
आणि
डि. बी.ए.परिवार
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
COMMENTS