ओतूर : जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील दलित वस्तीतील शांताराम तपासे यांच्या जागेत अनधिकृत बांधकाम केले असल्याने त्यांनी न्यायालयाच्...
ओतूर : जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील दलित वस्तीतील शांताराम तपासे यांच्या जागेत अनधिकृत बांधकाम केले असल्याने त्यांनी न्यायालयाच्या आदेशाने स्टे ऑर्डर आणली आहे.
वास्तविक शांताराम तपासे यांची पिंपरी पेंढार येथील दलित वस्ती येथे गट नंबर ३२७ मध्ये मालकी हक्काचे घरदेखील असून समोरच्या जागेत २८८ फुटाच्या जागेवर अनधिकृत शेड उभारण्याचा घाट येथे केला जात असल्याने शांताराम तपासे यांनी स्थानिक स्तरावरील ग्रामपंचायत येथे या संदर्भात विचारणा केली व मनाई केली असता त्यांच्या मालकी हक्काच्या जागेवर अतिक्रमण केले आहे असे त्यांनी क्राईमनामा लाईवशी बोलताना सांगितले व या गोष्टीमुळे तपासे यांनी स्थानिक स्तरावरील ओतूर पोलिस स्टेशन येथे संबंधितांविरोधात तक्रार दिली मात्र यावर न्याय निर्णय झाला नाही व त्यांनी वरील स्तरावर म्हणजे न्यायालयाची धाव घेत संबंधित जागेसंदर्भात न्यायालयिन प्रक्रिया सुरू असून संबंधित प्रकरणावर न्यायालयाने या जागेवर मनाई हुकूम दिला आहे. संबंधित जागेचं प्रकरण न्यायालयात दाखल आहे.
COMMENTS