सहसंपादक - प्रा. प्रविण ताजणे ( सर ) आज दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला क्रांती...
सहसंपादक - प्रा. प्रविण ताजणे ( सर )
आज दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला क्रांतीसुर्य जननायक धरती आबा वीर बिरसा मुंडा व राघोजी भांगरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शरद नवले व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सौ सविता आढारी व सौ रेश्मा केंगले यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध मनोगते व्यक्त केली तर सर्व मुलांना शालेय कमिटीच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले सर्व मुलांना बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक केले तर मुलांनी अतिशय सुंदर पेहराव परिधान करून आदिवासी संस्कृतीचे पोशाख घालून मुले आली होती सर्व मुलांना खाऊ वाटप केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व जागतिक आदिवासी दिनाची माहिती श्री. सुभाष मोहरे यांनी तर नियोजन सो आरती मोहरे यांनी केले तर मनोगत व शुभेच्छा सौ लिलावती नांगरे यांनी केले व आभार सौ स्मिता ढोबळे यांनी मानले.
COMMENTS