जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची स्थापना २१ सप्टेंबर १९२३ रोजी झालेली असून संस्था शताब्दी वर्ष साजरे करत आहे. जुन्नर तालुक्या...
जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची स्थापना २१ सप्टेंबर १९२३ रोजी झालेली असून संस्था शताब्दी वर्ष साजरे करत आहे. जुन्नर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या या पतसंस्थेच्या शताब्दी महोत्सवा निमित्त मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर आणि सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान सोहळा जयहिंद पॅलेस नारायणगाव येथे संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी मा. आशाताई बुचके सदस्य जिल्हा नियोजन आणि सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. अमोल बेनके हे होते. तसेच मा. संतोषनाना खैरे संचालक विघ्नहर सहकारी कारखाना, डॉक्टर पल्लवी बेनके युनिकेअर हॉस्पिटल डॉ.पंजाबराव कथे (कथे डायग्नोस्टिक) मा.सुदाम ढमाले अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक संघटना, मा. संतोष ढोबळे, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचेसल्लागार संजय डुंबरे, संपर्कप्रमुख मंगेश मेहेर, उपाध्यक्ष विनायक ढोले, राज्य प्रतिनिधी साहेबराव मांडवे, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे, महिला आघाडी अध्यक्ष सुशीला ताई डुंबरे, अखिल भारतीय शिक्षक संघ पुणेचे अध्यक्ष सुभाष मोहरे, जुन्नर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे, नेते विश्वनाथ नलावडे, कार्याध्यक्ष वैभव सदाकाळ, सरचिटणीस प्रभाकर दिघे, शिक्षक संघ महिला आघाडी अध्यक्ष शुभदा गाढवे, कोषाध्यक्ष अशोक बांगर, कार्यालयीनचिटणीस संतोष पानसरे, प्रवक्ते राजेंद्र चिलप, प्रसिद्धी प्रमुख दीपक मुंढे, संपर्कप्रमुख संदीप शिंदे, कोषाध्यक्ष मनीषा डोंगरे तसेच मोठ्या संख्येने सेवानिवृत्त सभासद, शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते अशी माहिती संस्थेचे सभापती विजय लोखंडे यांनी दिली.
सभापती विजय लोखंडे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या शंभर वर्षाचा इतिहास मांडला. संस्थेच्या उभारणीमध्ये योगदान दिलेल्या सर्व सेवानिवृत्त सभासदांचे ऋण व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित सर्व सेवानिवृत्त आणि कार्यरत सभासद शिक्षक बंधूभगिनी आणि नागरिक यांची आरोग्य तपासणी युनिकेअर हॉस्पिटल चाकण च्या डॉक्टरांच्या उपस्थितीत करण्यात आली. तसेच शिवनेरी ब्लड सेंटर मंचर मार्फत रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यात आले. संस्थेच्या सेवानिवृत्त आजी-माजी सभासदांचा सन्मान शाल, छत्री व गुलापुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी मा.आशाताई बुचके यांनी आपल्या मनोगतामध्ये मध्ये 100 वर्षामध्ये संस्थेने केलेली आर्थिक प्रगती, सामाजिक कार्यातील संस्थेचा सहभाग, सभासद हिताचे चांगले निर्णय, कर्जासाठी असलेला कमी व्याजदर, सभासदास मृत्यूनिधीतून दिले जाणारी ३० लक्ष रु. मदत या सर्व बाबींचे कौतुक करत भविष्यात संस्थेस आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
डॉ. पल्लवी बेनके यांनी शिक्षण तळागाळात पोहोचल्यानंतरच विकास शक्य आहे असे सांगितले. पतसंस्थेने सभासद शिक्षकांचे प्रपंच घडविण्यात मोठा हातभार लावला आहे असे उद्गार मा.सुदाम ढमाले यांनी काढले .
सभेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ.अमोल बेनके यांनी शंभर वर्ष सातत्य राखत यशस्वी वाटचाल संस्था करत आहे हे खरोखर कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार काढले .
संस्थेचे उपसभापती दतात्रय घोडे, मानद सचिव ज्ञानदेव गवारी, खजिनदार अंबादास वामन, सरचिटणीस विवेकानंद दिवेकर, पूनम तांबे, नानाभाऊ कणसे, अनिल कुटे, जितेंद्र मोरे, रविंद्र वाजगे, अविनाश शिंगोटे, संतोष पाडेकर, दिलीप लोहकरे, सुभाष दाते, उमेश शिंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक सचिन मुळे यांनी केले. संचालिका सविता कुऱ्हाडे आभार यांनी मानले.
आजी माजी सभापती, उपसभापती, सरचिटणीस व तालुक्यातील सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.
COMMENTS