विशेष प्रतिनिधी - प्रा. निलेश आमले ( सर) जुन्नर ता.23 येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयात माझी माती माझा देश या कार्यक्रमांतर्गत फूड अँड ...
विशेष प्रतिनिधी - प्रा. निलेश आमले ( सर)
जुन्नर ता.23 येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयात माझी माती माझा देश या कार्यक्रमांतर्गत फूड अँड फन कार्निवल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये मार्केटिंग स्किल डेव्हलपमेंट करणे, युवा उदयोजक निर्माण व्हावा असा असून यामध्ये खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल, सौंदर्यप्रसाधनचे स्टॉल, राख्या,हेडफोन,हस्तकलेच्या वस्तू इत्यादी स्टॉल मध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा.अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी प्राचार्य डॉ.एम.बी वाघमारे,उपप्राचार्य डॉ आर.डी चौधरी,उपप्राचार्य (कनिष्ठ महाविद्यालय) प्रा श्रीमती पी एस लोढा,पर्यवेक्षक प्रा एस.ए.श्रीमंते,कॉमर्स विभाग प्रमुख प्रा ए.पी ढोले मॅडम सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अॅड संजय काळे साहेब यांनी उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व विदयार्थ्यांचे कौतुक केले.
COMMENTS