सहसंपादक- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,बेल्हे या महाविद्यालयास शैक...
सहसंपादक- प्रा. प्रविण ताजणे ( सर )
समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,बेल्हे या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून बी.एस्सी(कॉप्युटर सायन्स) व एम एस्सी (कॉम्प्युटर सायन्स) या अभ्यासक्रमांची नवीन तुकडी सुरू करण्यास महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच मान्यता दिली असल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.
समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स या महाविद्यालयामध्ये यापूर्वी बीएस्सी कॉम्पुटर सायन्स (बीसीएस), एम एस्सी कॉम्पुटर सायन्स, एम एस्सी कॉम्पुटर एप्लीकेशन हे अभ्यासक्रम सुरू आहेत.विद्यार्थ्यांचा कॉम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाकडे वाढता कल पाहता मोठ्या प्रमाणावरती सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या होती.आणि त्या अनुषंगाने महाविद्यालयाने तुकडी वाढीसाठी प्रस्ताव सादर केलेला होता.
उत्कृष्ट यशस्वी निकालाची परंपरा,मल्टिनॅशनल कंपन्यांसोबत ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत नोकरीसाठी सामंजस्य करार,उत्कृष्ट व अनुभवी अध्यापक वर्ग,सुसज्ज ग्रंथालय व क्रीडा संकुल ही महाविद्यालयाची वैशिष्ट्ये आहेत.
बीएस्सी कॉम्पुटर सायन्स या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी बारावी सायन्स गणित विषयासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र आहेत. तसेच एमएस्सी कॉम्पुटर सायन्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी बीएस्सी (कॉम्पुटर सायन्स) पास झालेले विद्यार्थी पात्र आहेत.
प्रवेशासाठी अधिक माहितीसाठी डॉ.उत्तम शेलार- ९८८१४१८६७६,डॉ.लक्ष्मण घोलप-८७८८५०१९०९ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
COMMENTS