जुन्नर : सध्या आपण अनेक ठिकाणी डेंग्यू चिकुन गुण्यासारख्या आजारांचा फैलाव होताना पाहत आहोत. मात्र सहसंचालक आरोग्य सेवा ( हिवताप ) डॉ.प्रताप...
जुन्नर : सध्या आपण अनेक ठिकाणी डेंग्यू चिकुन गुण्यासारख्या आजारांचा फैलाव होताना पाहत आहोत. मात्र सहसंचालक आरोग्य सेवा ( हिवताप ) डॉ.प्रतापसिंह सरनीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे, जुन्नर पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ व आरोग्य पर्यवेक्षक दिलीप कचेरे यांच्या समन्वयातून जुन्नर तालुक्यात डेंग्यू, चिकुन गुनिया, हिवताप, हत्तीरोग यासारखे आजार होऊ नये म्हणून नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहे.
त्यानुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये डासांपासून पसरणाऱ्या आजारांविषयी माहिती होणे गरजेचे असल्याने मागील महिन्यात विद्यार्थ्यांसाठी ' डेंग्यूचा डास, नको हा त्रास' व 'स्वच्छता पाळा,डेंग्यू आधार टाळा' या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते, यावेळी जुन्नर तालुक्यातील सुमारे 31 शाळा -महाविद्यालयातील 732 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला असून तालुक्यातील 102 आशा कार्यकर्त्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला होता. पंचायत समिती आरोग्य विभागा कडून निबंध स्पर्धेचा निकाल लवकरच घोषित करण्यात येईल.
तसेच दि.21 ऑगस्ट 23 रोजी नारायणगाव ग्रामपंचायतीचे लोकप्रिय सरपंच बाबू पाटे, ग्राम विकास अधिकारी नितीन नाईकडे आणि वारूळवाडी सरपंच राजेंद्र मेहेर, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे यांच्या सहकार्याने येथे डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वारूळवाडी, ग्रामपंचायत नारायणगाव व वारूळवाडी यांच्या समन्वयातून डास अळ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. शहरामध्ये डास अळ्याची घनता वाढल्याने तात्काळ तालुक्यातील प्रा आ. केंद्र व मढ, आपटाळे व निमगाव सावा येथील आरोग्य कर्मचारी व स्थानिक आशा कार्यकर्ती यांच्या माध्यमातून कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले.त्याचाच भाग म्हणून दोन्हीही ग्रामपंचायतीने भरारी पथकाची स्थापना करून कार्यक्षेत्रातील पंचर काढणाऱ्या सेंटरला भेट देऊन डास आळ्या वाढण्यास कारणीभूत असलेले टायर जप्त करून. योग्य ती विल्हेवाट लावली. आरोग्य पथकाने नारायणगाव पोलीस स्टेशनला भेट देऊन डेंग्यू, चिकुन गुन्या, झिका, हिवताप, हत्तीरोग होऊ नयेत या बाबत आरोग्य पर्यवेक्षक दिलीप कचेरे यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना माहिती सांगितली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर साहेब, आळे येथील पोलीस निरीक्षक नलावडे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांडगे साहेब, महादेव शेलार साहेब, आळे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक बडगुजर साहेब,सहाय्यक पो. निरीक्षक दुर्वे साहेब, जुन्नर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश घाडगे साहेब आदींची उपस्थिती व सहकार्य लाभले.तसेच दोन्ही ग्रामपंचायतीने तातडीची बाब म्हणून धूरफवारणी करण्याची योजना हाती घेतली असून,याद्वारे डासांचे उच्चाटन करण्यात येत आहे.
आरोग्य विभागातील डॉ.वर्षा गुंजाळ,डॉ. चैताली कांगुणे,दिलीप कचेरे, राजेंद्र अरकीले,सोपान घोगरे, नरेंद्र देठे, करण परदेशीं,तसेच नारायणगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी राजेंद्र हांडे, संजय जाधव, अजय जाधव, दशरथ गाडगे, धनेश माने तर वारूळवाडी ग्रामपंचायत कर्मचारी दत्ता जाधव, अशोक काळे, रवींद्र ओव्हाळ आदींनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
COMMENTS