जुन्नर – जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रूग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वीजेच्या खांबावरील लाईट नसल्याने रूग्ण व...
जुन्नर – जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रूग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वीजेच्या खांबावरील लाईट नसल्याने रूग्ण व नातेवाईकांना रात्रीच्या वेळी या रूग्णालयाकडे जाताना मोठ्या कसरतीने जावे लागत असून या गोष्टीची दखल रूग्णालय प्रशासन व वीजवितरण विभाग जुन्नर यांनी वेळीच घेतली पाहिजे.
कारण, जुन्नर तालुक्यातील हे शासकीय
रूग्णालय असून येथे जुन्नर व जुन्नरच्या पश्चिम भागातील रूग्णांना येथे उपचाराकरीता
आणले जाते, मात्र रात्रीच्या वेळी या ठिकाणी रस्त्यावरील वीजेच्या खांबावरील लाईट
रात्रभर नसल्याने नातेवाईक व इतर लोकांना जाताना त्रास सहण करावा लागत आहे, या गोष्टीची
रूग्णालय प्रशासन व वीजवितरण विभाग यांनी वेळीच दखल घेऊन येथील वीजेच्या खांबावरील
लाईट सुरळीत करण्याची मागणी रूग्णांचे नातेवाईकांनी केली आहे.
COMMENTS