एखाद्या परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा नापास झाल्यावर आत्महत्येचा प्रयत्न, मानसिक ताण अशा गोष्टी सातत्याने ऐकल्या असतील. पण अपयशावर मात करत...
एखाद्या परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा नापास झाल्यावर आत्महत्येचा प्रयत्न, मानसिक ताण अशा गोष्टी सातत्याने ऐकल्या असतील. पण अपयशावर मात करत यशस्वी होण्यासाठी एक जिगर लागते. जी लढण्याची ताकद देते. प्रशांत खर्डीवारचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा गोंडपिपरीतील प्रशांतला प्रशासकीय सेवेत घवघवीत यश मिळाले आहे. त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध पदाच्या सहा मुलाखती दिलेल्या आहेत. त्याला तब्बल तीन वर्षांनी सहायक प्रशासकीय अधिकारी पद मिळाले.
यश सहजपणे मिळत नाही त्याआधी अपयशाची पायरी चढावी लागते. याचे प्रशांत याने जाणले होते.आठवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर प्रशांतने अचानक शाळा सोडली आणि शेतीत लक्ष घातले. पुढे त्याने चार वर्ष शेती केली. कालांतराने शिक्षणाचे महत्त्व लक्षात आल्यावर व शिक्षणाविषयी आवड निर्माण झाल्याने प्रशांतने पुन्हा शाळेत प्रवेश घेतला. पुढे दहावीची परीक्षाही दिली. पण, पहिल्याच प्रयत्नात तो अपयशी ठरला.
पण, प्रशांतने हार मानली नाही.तर मेहनत केले आणि शिक्षणाची वाट मोकळी गेले. इतकेच नाहीतर बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. शिक्षणासाठी काही तरी करायला हवे हे जाणून त्याने डी.एडच शिक्षण पुर्ण केले. पण नोकरीची आशा नाही, लवकर शिक्षक भरती होणार नाही म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला. याच जिद्द आणि मेहनतीच्या बळावर प्रशांतने सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदापर्यंत मजल मारली.
COMMENTS