मेंदू (Brain) हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग असून तो संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतो. आपल्या इंद्रियांना आज्ञा देण्याचं काम देखील म...
मेंदू (Brain) हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग असून तो संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतो. आपल्या इंद्रियांना आज्ञा देण्याचं काम देखील मेंदू करत असतो. मेंदूवर वाईट परिणाम पडू नये यासाठी आपल्याला आपल्या मनाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
दैनंदिन जीवनामध्ये आपल्या अशा काही वाईट सवयी असतात. त्या आपण सोडू शकत नाही परंतु त्याचे दुष्परिणाम मेंदूवर होताना दिसतात. आणि यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होताना दिसतो. दररोज एक्सरसाइज करणे, भरपूर झोप घेणे, बॅलन्स डाएट या सर्व गोष्टींमुळे आपल्या मेंदूच्या कोशिकांना मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे आणि ऑक्सिजन मिळतो. परंतु खराब लाईफस्टाईल, स्ट्रेस, कमी झोप, अनहेल्दी वस्तूमुळे आपल्या जीवनावर आणि मेंदूच्या हेल्थ वर वाईट परिणाम पडतो. चला याबाबत सविस्तर जाणून घेऊया...
खराब लाईफस्टाइल असलेल्या लोकांचा मेंदू हा वेळेपूर्वी म्हातारा होतो. जे व्यक्ती नियमित व्यायाम करण्याऐवजी संपूर्ण वेळ सोप्यावर बसून घालवतात त्यांच्यासाठी हे अत्यंत धोकादायक असून मेंदू सह त्यांच्या आरोग्यावर देखील याचा खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे चांगली लाईफ स्टाईल असणे गरजेचे आहे.
आज-काल लोक रात्रंदिवस मोबाईल पाहत असतात. त्याचबरोबर बऱ्याच कारणांमुळे देखील काही लोकांना झोप येत नाही. शरीराला व्यायामा सोबतच झोप अत्यंत महत्त्वाची असते. जे लोक रोज 7 ते 8 तास पूर्ण झोप घेत नाहीत त्यांच्या मेंदूवर, आरोग्यावर त्याचबरोबर त्वचेवर देखील परिणाम दिसून येतो. त्याचबरोबर कमी झोपेमुळे स्ट्रेस लेवल देखील मोठ्या प्रमाणात वाढते.
ताण तणावाचा देखील मेंदूवर मोठा परिणाम पडतो. लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवर स्ट्रेस घेण्याची सवय असते. त्यामुळे त्यांचा बीपी वाढणे, मेमरी आणि लर्निंग प्रोसेस वर परिणाम पडतो. यासोबतच मेंदूवर देखील ताण पडतो. त्यामुळे रोज मेडिटेशन आणि योग केल्याने स्ट्रेस कमी होऊ शकतो.
जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नसाल तर अत्यंत चुकीचा परिणाम मेंदूवर पडतो. त्याचबरोबर जर तुम्ही जास्त साखर खात असाल तर तुमचे मन संकुचित आणि मेंदूला रक्तपुरवठा देखील कमी प्रमाणात होऊ शकतो. अशावेळी जर मेंदूला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा पोहोचला नाही तर ब्रेन स्टॉक यासारखे आजार होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे योग्य आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे.
जर तुम्ही लॅपटॉप, मोबाईल किंवा टीव्हीच्या स्किन जवळ जास्त वेळ घालवत असाल तर त्यामधून निघणारा ब्लू लाईट हा तुमच्या डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर वाईट प्रभाव पाडू शकतो. त्याचबरोबर मेंदूवर देखील याचा वाईट परिणाम पडू शकतो.
COMMENTS