जुन्नर :प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप जुन्नर तालुका च्या वतीने नामदार श्री बच्चूभाऊ कड...
जुन्नर :प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप जुन्नर तालुका च्या वतीने नामदार श्री बच्चूभाऊ कडू याच्या वाढदिवसा निमिताने दिनांक 7/7/23रोजी सकाळी 10वाजता जुन्नर तालुकयातील जळवंडी या ग्रामीण भागातील दिव्यांग, विधवा, जेष्ठ नागरिक, निराधार, सोडचिठ्ठी झाले ले, परित्यक्ता, अनाथ लोकाच्या विविध अडचणी सोडवण्या करीता अनेक लोकांनी संस्थेकडे मागणी केली आहे आमच्या ग्रामीण भागातील दिव्यांग लोकांना अनेक अडचणी येतात शासनाकडून मिळणार्या विविध योजना ची लवकर माहीती होत नाही व मोबाइल रेंज नसल्याने या भागातील लोकांना लवकर संम्पर्क होत नाही तालुकयाच्या ठिकाणी हेलपाटे मारूनही काम होत नाही अश्या विविध अडचणी सोडवण्यासाठी मा श्री गौरव भाऊ जाधव राज्य समन्वय प्रहार जनशक्ती महाराष्ट्र व नयनभाऊ पुजारी, उमेश भाऊ महाडीक, नौशाद भाऊ शेख, अमोल मानकर साहेब, रूग्ण सेवक महाराष्ट्र राज्य याच्या मार्गदर्शनात दिव्यांग जनजागृति अभियान अंतर्गत श्री बच्चूभाऊ कडू याच्या वाढदिवसाच्या निमिताने प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप जुन्नर ,जिल्हा परिषद पुणे समाज कल्याण विभाग व पंचायत समिति जुन्नर समाज कल्याण विभाग जुन्नर तालुका, दिव्य दृष्टि संस्था राजुरी, लोक सेवा केंद्र जुन्नर, आदिवासी युवक परिवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ग्रुप, राज फाउंडेशन जुन्नर, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन शिरूर कारेगाव प्रहार बेघर महीला संघटना जुन्नर तालुका व ग्रुप ग्रामपंचायत जळवंडी याच्या वतीने ऐकूण 10ग्रामपंचायत हद्दीतील गरजू लोकांना ऐकत्र करत दिव्यांग जनजागृति अभियान अंतर्गत शासनाकडून मिळणार्या विविध योजना ची माहीती फलक लावण्यात आले तसेच मोफत साहित्य वाटप पुर्व नाव नोंदणी, नविन ऑनलाइन प्रमाण पत्र काढण्यास रजिस्टर नोंद करून घेण्यात आली जिल्हा परिषद पुणे समाज कल्याण विभाग व पंचायत समिति जुन्नर समाज कल्याण विभाग मार्फत दिव्यांग लोकांना युनिक कार्ड (यु डी आई डी,), दुर्धर आजार, उदरनिर्वाह भत्ता, बिज भांडवल कर्ज प्रकरण चे अर्ज मान्यंवराच्या हस्ते वाटप करण्यात आले , तहसील कार्यालय जुन्नर च्या वतीने संजय गांधी पैन्शन योजना करीता येणार्या अडचणी व लागणारे कागदपत्र ची पुर्तता तसेच हयातीचा दाखला व आधार कार्ड व ज्या लोकांना संजय गांधी पैन्शन योजना सुरू आहे अश्या लोकांनी आप आपल्या गावात तलाठी कार्यालय मध्ये आपले स्वता चे आधार कार्ड झेराक्स वर मोबाइल नंबर देवून 2/3 दिवसात तलाठी कार्यालय जमा करावे असे आव्हान करण्यात आले , लोक सेवा केंद्र जुन्नर याच्या वतीने आभा कार्ड, ऑनलाइन प्रमाण पत्र काढण्यास रजिस्टर नोंदणी, इ श्रम कार्ड, नोंदणी 0बॅलन्स मध्ये बॅक खाते उघणे व शेतकरी वर्गासाठी 1रूपयात पिक विमा चे व के,वाय,सी करून घेण्यासाठी मार्गदर्शन श्री मिलीद खरात साहेब यानी केले , प्रथम एज्युकेशन फाउंडेशन शिरूर कारेगाव चे श्री एकनाथ पंराडे साहेब यानी सुक्षशित बेरोजगार वय 18ते35 वयोगटातील 8वी पास पुढील युवक, युवतिना विविध कोर्स ची माहीती देवून मोफत रहाणे, जेवण, शैक्षणिक साहित्य व प्रशिक्षणा नंतर लगेचच नोकरी देण्यात येणार आहे या करीता आपण प्रशिक्षण कौशल घेवून नोकरी करावी , तसेच श्री राधेश्याम संस्थेचे च्या वतीने ज्या मुलाचे आई वडील कोरोना काळात निधन झाले कीवा इतर कारणाने निधन झाले तसेच ज्या मुलांना आई नाही किवा वडील नाही ज्या आई वडीलाचा कोर्ट कचेरी केसेस चालू आहे, व इतर कारणाने मुले ऐकटे आहेत अश्या वय 0, ते 18 वयोगटातील अनाथ मुलांना दत्तक घेण्यात येणार त्याचे शिक्षण व रहाण्याची सोय संस्था करणार आहे या करीता नाव नोंदणी करण्यात आली व अजून ग्रामीण भागातील व शहरातील मुलाची नाव नोंदणी करण्याकरीता संम्पर्क करून संस्थेकडे नाव नोंदणी करावी तसेच ज्या विधवा निराधार परित्यक्ता, जेष्ठ नागरिक, सोडचिठ्ठी झाले व जेष्ठ नागरिक लोकांना संजय गांधी पैन्शन योजना त्यांचा मुलांचे वय 25 वर्ष झाल्यावर संजय गांधी पैन्शन योजना शासनाकडून बंद करण्यात आली अश्या गरजू लोकांना पुन्हा पैन्शन योजना सुरू व्हावी म्हणून मार्गदर्शन व नाव नोंदणी करण्यात आली , तसेच ज्या दिव्यांग व जेष्ठ नागरिक लोकांना आवश्यक साहित्य साधने करीता नाव नोंदणी करण्यात आली या मध्ये तीनचाकी सायकल, काठी, वाॅकर , कॅलिपर ,बुट, कुबडया , कानाची मशीन,कृत्रिम पाय, व्हीलचेयर ,नंबर चे चश्मा इत्यादि साहित्य करिता नाव नोंदणी करण्यात आली या कार्यक्रमात मा. श्री .रविन्द्र सबनिस साहेब तहसीलदार जुन्नर, श्री शरदचंद्र माळी साहेब गटविकास अधिकारी जुन्नर पंचायत समिति , श्री संभाजी भांगरे साहेब जुन्नर तालुका दिव्यांग कक्ष अधिकारी तसेच श्री शंकर भालेराव साहेब जुन्नर पंचायत समिति समाज कल्याण विभाग यांच्या व प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, श्री अरुण शेरकर अध्यक्ष साहेब याच्या मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडला या वेळी जळवंडी ग्रामपंचायत चे सरपंच श्री किरण शेळकंदे, ग्रामसेवक श्री जालिंदर गाडेकर, श्री बाळू करवंदे पोलीस पाटील, लक्ष्मण बांगर सदस्य, राहुल मुसळे उपाध्यक्ष, सौरभ मातेले, श्रीहरी नायकोडी, केरभाऊ नायकोडी, हनुमंत थोरवे, विजय शेळके, अमोल तळपे, राजेंद्र ठोंगिरे सरपंच, श्रीकांत जाधव राज फाउंडेशन, संचित घोगरे,संजय केदारी, नंदाताई खोमणे, केशव मुकणे, लक्ष्मण सरोगदे, रूपाली शिन्दे, सोमा वायाळ, शिवराम सोनवणे, शिवाजी गेत्रीर,महादेव भांगले,नंदकुमार नांगरे,काशीनाथ बुळे व दिव्यांग, महीलावर्ग ,कार्यकर्ता उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक श्री दिपक चव्हाण संस्थापक अध्यक्ष यानी आपल्या अडचणी सोडवण्या करीता संस्था च्या कार्यालयात संम्पर्क करावा म्हणून आव्हान केले आहे या वेळी श्री लक्ष्मण बांगर यानी सर्व उपस्थित पदाधिकारी ,कार्यकर्ता व लाभार्थी चे आभार मानले
COMMENTS