वडगाव कांदळी : दि.१८.०७.२०२३ रोजी, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, तालुका आरोग्य अधिका...
वडगाव कांदळी : दि.१८.०७.२०२३ रोजी, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.वर्षा गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली तसेच तालुका आरोग्य पर्यवेक्षक दिलीप कचेरे यांचे माध्यमातून तालुक्यात विविध ठिकाणी डेंग्यु पारेषणकाळा निमित्त जनजागृती करण्यात येत आहे. तालुक्यातील, वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचे माध्यमातून डेंग्यु जनजागृती करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने वडगाव कांदळी येथील हिंद माता माध्यमिक,उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय येथे डेंग्यु पारेषनकाळा निमित्ताने आरोग्य पर्यवेक्षक दिलीप कचेरे यांचे 'हसत खेळत, डासांवर पाळत' या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दिलीप कचेरे यांनी अतिशय विनोदी पद्धतीने डासांपासून होणारे आजार, त्यांची लक्षणे, आणि त्यावर घ्यावयाची काळजी याबाबत व डास चावण्यापासून उपाययोजना करण्यापेक्षा, डास उत्पत्ती होणारच नाही याबाबत अतिशय विनोती पद्धतीने आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत माहिती सांगितली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ चव्हाण सर यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. यादव सर यांनी सूत्रसंचालन केले तर वेठेकर सर यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळवंडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माठे, आरोग्य सहाय्यक दत्ता शेलार, आरोग्य सेवक नितीन निघोट, आरोग्य सेविका ज्योती जागडे, आशा कार्यकर्ती रोहिणी पवार, सुनीता गुंजाळ यांनी तर विद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ चव्हाण, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता पाचवी ते बारावीतील सर्व विद्यार्थी यांनी विशेष योगदान दिले.
COMMENTS