सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) रविवार दि 9 जुलै 2023 रोजी अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाची सभा रांजणगाव...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
रविवार दि 9 जुलै 2023 रोजी अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाची सभा रांजणगाव गणपती शिरूर येथे आयोजित करण्यात आली होती या निमित्ताने मा.स्वर्गीय भाईसाहेब दोंदे व स्वर्गीय सुलभाताई दोंदे यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. राज्यभरातील तीस जिल्ह्यांचे सर्व जिल्हाध्यक्ष,सरचिटणीस व कार्याध्यक्ष तसेच जिल्हा पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते. राज्यभरातील सर्व सन्मा. पराधिकारी यांचे अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्हा कार्यकारणीची पुर्नरचनेसाठी राज्य उपाध्यक्ष श्री.अनिल महाजन यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.त्यांनी दिलेल्या अहवाल नुसार कार्यकारणी निवडीची नियुक्ती पत्र देण्यात आली. यामध्ये जुन्नर तालुक्यातील उच्छिल प्राथमिक शाळेचे तंत्रस्नेही, विद्यार्थी प्रिय व उच्च पदवी विभुषित पदवीधर शिक्षक आदर्श शिक्षक श्री. सुभाष अरुण मोहरे यांची अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या "जिल्हाध्यक्षपदी" निवड करण्यात आली तर सरचिटणीसपदी श्री. सुरेश थोरात शिरूर व कार्याध्यक्षपदी श्री. विजय सुतार मावळ तसेच सौ. साधना खोमणे यांची जिल्हा महिला आघाडी पुणे जिल्हा या सर्वांची बहुमताने निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मा. देविदास बसवदे, राज्य संघाचे जेष्ठ मार्गदर्शक व सल्लागार मा. सुरेश भावसार, मा. विश्वनाथ सुर्यवंशी, राज्य सरचिटणीस मा. कल्याणजी लवांडे राज्य विभाग प्रमुख मा. किरण पाटील मा. हरिदास घोगरे मा. प्रमोद पाटील मा भगवान पाटील राज्य उपाध्यक्ष मा महेश देशमुख मा अनिल महाजन मा. सुनिल जाधव महिला विभाग प्रमुख मा. वंदना भोयर महिला उपसरचिटणीस मा. संगिता देव तर संयुक्त चिटणीस दिपक भुजबळ , म. ल. देसाई आदि राज्य पदाधिकारी उपस्थित होते.
अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मा. शिवाजीराव वाळके अध्यक्ष यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचालन सौ.शर्मिला अर्जुन निश्चित व सौ.साधना खोमणे यांनी केले सर्वाचे स्वागत श्री. अर्जुन निश्चित यांनी केले उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार राज्य उपाध्यक्ष श्री. अनिल महाजन माजी जिल्हाध्यक्ष श्री. किरण गावडे श्री.रमेश थोरात श्री. शिवाजी पठारे श्री. आनंदा मांडवे श्री. तुकाराम हगवणे यांनी केले.
या प्रसंगी जुन्नर तालुका अध्यक्ष श्री.विवेक हांडे श्री हनुमान हांडे श्री. रविंद्र डुंबरे श्री. गणपत रेंगडे श्री. लक्ष्मण लांडे श्री. भरत रोंगटे श्री ज्ञानदेव दाभाडे श्री. नंदकुमार साबळे श्री. खेवजी मोरे श्री.शांताराम साबळे श्री ज्ञानदेव जोशी श्री सुदाम उतळे श्री.संदिप तळपे आदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर महिला आघाडीच्या सौ छाया डुंबरे श्रीम.सुमन उतळे, यांच्यासह आदी उपस्थित होते.
COMMENTS