आरोग्य टिप्स : इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सचा अतीवापर, चुकीच्या जीवनशैलीमुळे, मेंदूचे योग्य पोषण न झाल्यास, स्मणशक्तीवर त्याचा विपरित परिणाम होऊ ...
आरोग्य टिप्स : इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सचा अतीवापर, चुकीच्या जीवनशैलीमुळे, मेंदूचे योग्य पोषण न झाल्यास, स्मणशक्तीवर त्याचा विपरित परिणाम होऊ लागतो आणि मग लहानसहान गोष्टी माणूस विसरतो. जाणून घ्या स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपाय –
1. मोबाईलचा वापर गरजेपुरताच करा. आकडेमोड करण्यासाठी कॅल्क्युलेटर ऐवजी मेंदू वापरा.
2. नियमित प्राणायाम आणि योगासनांचा करा. प्राणायाम केल्यानं शरीरावरील ताण कमी होतो. शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित राहतं, ज्यामुळे मेंदूच्या स्नायूंना मजबुती मिळते. स्मरणशक्ती चांगली होते.
3. व्यस्त जीवनशैलीमुळे बर्याच लोकांना पुरेशी झोप घेता येत नाही यामुळे मानसिक आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होतो. यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीवर देखील परिणाम होतो. केवळ मेंदूसाठीच नव्हे तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी देखील झोपेची खूप आवश्यकता असते. परिपूर्ण झोपेमुळे शरीराची झीज आणि कमतरता भरून निघते.
4. सकाळी भिजवलेले बदाम खा.
5. मेंदू सक्रिय राहण्यासाठी दररोज नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.
6. चांगल्या पुस्तकाचं वाचन करा. त्यावर चिंतन-मनन, चर्चा करा.
7. आहारामध्ये फळांचा, पालेभाज्या, व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा वापर करा. जेवणाअगोदर एक सफरचंद खावे. पुरेसे पाणी प्या. शरीर हायड्रेट राहिल्याने मेंदूचे पोषण होते. बीटरूट रस प्यावा. नियमित अक्रोडाचे सेवन करावे. मधाचे नियमित सेवन केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
8. रात्री झोपताना हळद घातलेले दूध प्या ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल. तसेच मेंदूचे पोषण होईल.
COMMENTS