महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका शिव जन्मभूमी जुन्नर तालुक्यातील पहिला पर्यटन पूरक पेट्रोलपंप सह्याद्री पेट्रोलियम खामुंडी यांना नुकताच दि...
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका शिव जन्मभूमी जुन्नर तालुक्यातील पहिला पर्यटन पूरक पेट्रोलपंप सह्याद्री पेट्रोलियम खामुंडी यांना नुकताच दिनांक 6/7/2023 रोजी Best Looking New Retail Outlet म्हणून इंडियन ऑईल कॉर्पोरेशन पुणे विभागीय कार्यालय कडून सन्मान करण्यात आला.
नुकत्याच सुरू झालेल्या सह्याद्री पेट्रोलियम खामुंडी येथे जुन्नर तालुक्यातील विविध पर्यटन स्थळे , प्रेक्षणीय ठिकाणे यांची सचित्र माहिती ,पर्यटन विषयक नाविन्यपूर्ण नकाशा आजू बाजूच्या भिंतीवर लावण्यात आला आहे. येथे येणारे पर्यटक आवर्जून ही माहिती वाचत असतात.आपल्या जुन्नर मधील पर्यटनाला त्याचा उपयोग करत आहेत. त्याचं बरोबर संगणक चया माध्यमातून जुन्नरच्या जबाबदार पर्यटन विषयक माहिती देखील येथे उपलब्ध केली आहे, पेट्रोल पंप वरील कर्मचारी येथे येणाऱ्या पर्यटकांना देखील पर्यटन विषयक माहिती देत आहेत. या मुळे निश्चितच पर्यटन तालुका जुन्नर च्यां प्रचार आणि प्रसिद्धीस मदत होईल असे वाटते.
इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे येथे नुकताच डीलर मिट मध्ये श्री.शिवम श्रीवास्तव सिनिअर मॅनेजर सेल्स , श्री. भिमराज सोनवणे असिस्टंट मॅनेजर व इतर अधिकारी यांचे उपस्थितीत सह्याद्री पेट्रोलियम यांना Best Looking New Retail Outlet म्हणून ट्रॉफी व प्रमाणपत्र देवून विशेष सन्मानित करण्यात आले.
COMMENTS