छायाचित्र: विजय पोटे. बेलसर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात गेले पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी ओढ्यांतून तुडुंब पाणी भरू...
बेलसर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात गेले पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी ओढ्यांतून तुडुंब पाणी भरून वाहत आहे.
जुन्नरच्या पश्चिम भागातील बोतार्डे, राळेगण, बेलसर, सोनावळे, भिवाडे, इंगळूण, आंबे हातवीज व वरील गावांत जोरदार पावसामुळे काही शेतकर्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत.
मात्र गेले पाच दिवसांपासून पावसाने जोरदार सुरूवात केल्याने नदी व ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.
वरील भागातील भिवाडे व घंगाळदरे या दोनही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुढे वडज धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तरी पावसाळ्यात नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी असे क्राईमनामा लाईव न्युजच्या वतीने आपणास विनम्र आवाहन.
COMMENTS