प्रतिनिधी : वडगाव सहाणी वडगाव सहाणी येथील माजी विद्यार्थी संघटना वडगाव सहानी यांच्या वतीने जि प शाळा वडगाव सहाणी, जि प शाळा शिंदेमळा, अंगण...
प्रतिनिधी : वडगाव सहाणी
वडगाव सहाणी येथील माजी विद्यार्थी संघटना वडगाव सहानी यांच्या वतीने जि प शाळा वडगाव सहाणी, जि प शाळा शिंदेमळा, अंगणवाडी वडगाव सहाणी गावठाण, शिंदेमळा व क्रांतिवीर उमाजी नाईक वस्ती यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप सरपंच सौ वैशालीताई तांबोळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यामध्ये वह्या, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, तेलखडू, चित्रकला वह्या, सुलेखन वह्या, पॅड वाटप करण्यात आले.
याप्रसंगी वडगाव सहाणी गावच्या आदर्श सरपंच सौ वैशाली भाऊसाहेब तांबोळी, माजी उपसरपंच श्री खंडेराव विश्राम शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री हंबीरशेठ वाबळे, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष श्री अरुण दत्तात्रय तांबोळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रमेश महाराज वाबळे, उपाध्यक्ष श्री अमोल ज्ञानेश्वर तांबोळी, श्री शैलेश भाऊ वाबळे श्री मंगेशनाना वाबळे, युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील शिंदे, युवा उद्योजक श्री मदनभाऊ वाबळे, गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे, श्री मच्छिंद्र तांबोळी, श्री विजय तांबोळी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री गणेश तांबोळी, श्री निलेश सोनवणे, श्री जयेश वाबळे, श्री संतोष तांबोळी, सौ कल्याणीताई वाबळे, सौ संगीताताई शिंदे, सौ संगीता चव्हाण मॅडम, अंगणवाडी ताई सौ निता चिंतामण वाबळे, सौ स्वातीताई कैलास तांबोळी, सौ चंदा सोपान चव्हाण, शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र बेलवटे सर यांनी केले तर आभार श्री बाळासाहेब बांबळे सर यांनी मानले.
COMMENTS