मुख्य संपादक:- प्रा.सतिश शिंदे जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी या छोट्या गावातून अमोल बाळाजी खरात यांनी अखंड परिश्रम घेत पी.एस.आय परिक्षेत यश ...
मुख्य संपादक:- प्रा.सतिश शिंदे
जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी या छोट्या गावातून अमोल बाळाजी खरात यांनी अखंड परिश्रम घेत पी.एस.आय परिक्षेत यश मिळवले. खरं तर अमोल यांचे वडिल सध्या कामानिमित्त पुणे येथे स्थायिक आहेत. मात्र अथक परिश्रमानंतर दिलेल्या २०२० च्या परीक्षेचा निकाल यंदाच्या वर्षी लागला असून या परिक्षेत अमोल बाळाजी खरात यांनी घवघवीत यश संपादन केले यामुळे जुन्नर तालुक्यात व बल्लाळवाडी तसेच सर्वत्र आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.
आई वडील दोघेही मोलमजुरी करणारे.. शिकून मोठं व्हायचं स्वप्न या घरातील तरुणाने पाहिले. आई-वडिलांसोबत कामात तर मदत केलीच तसेच वेळ देऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली.
काही करण्याची इच्छा असेल तर त्याच्या स्वप्नांना कोणीही रोखू शकत नाही हेच अमोल खरात यांनी दाखवून दिलं आहे अमोल खरात यांची पी एस आय पदी निवड झाल्यामुळे त्याच्या आई-वडिलांना आपल्या मुलाचा सार्थ अभिमान आहे त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज आपल्या मुलाच्या परीक्षेमधून मिळालेल्या यशातून पूर्ण झाल्या असल्याच्या भावना अमोलच्या आईवडिलांनी बोलून दाखवल्या.
खाकी वर्दी अंगावर असावी असं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाने गरिबीशी लढत अमोल खरात याने आकाशाला गवसणी घातली आहे.
काबाडकष्ट करून स्पर्धा परीक्षांसारख्या अवघड परीक्षेला सामोरे जाऊन त्यात यश मिळवणं, हे नक्कीच स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत उदाहरण आहे.
COMMENTS