सहसंपादक:- प्रविण ताजणे ( सर ) समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेल्हे येथील ...
सहसंपादक:- प्रविण ताजणे ( सर )
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेल्हे येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या "कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह २०२३" अंतर्गत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील २० विद्यार्थ्यांची "ग्रॉअस आटो इंडिया प्रा.लि.पुणे" या कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.अमोल खतोडे यांनी दिली.
पुढील पाच वर्षांमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल या क्षेत्रामध्ये परदेशी कंपन्या भारतामध्ये नवीन आउटलेट सुरु करणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेकविध संधी उपलब्ध असल्याचे प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी सांगितले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:
निखिल हिंगे, सत्यवान दातीर, वैभव नरड, सागर धमक, श्रीधर उंडे, सुरज फुटाणे, महेश पठारे, अभिजित तळेकर, दानिश आतार, ओंकार कंधारे, अशपाक पठाण, साहिल मोमीन, सानिया पठाण, हर्ष चव्हाण, विशाल देशमुख, इच्छा औटी, तुषार जोरे, मयूर कुचिक, ऋषिकेश गवळी, मयूर औटी.
या विद्यार्थ्यांना क्वालिटी इंजिनिअर म्हणून तर बी कॉम च्या कल्याणी मंडलिक व प्रणाली लांडगे यांची स्टोअर एक्झिक्युटीव्ह म्हणून निवड करण्यात आली.
अंतिम वर्षातील इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्यपूर्ण प्रयत्न करत असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.
कंपनीच्या वतीने एच आर प्रतिक्षा के तसेच ऑपरेशन मॅनेजर अनिल वने, विश्वदीप पिंपळे यांनी विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण केली.
सदर प्लेसमेंटसाठी प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर, प्रा.विपुल नवले, प्रा.भाऊसाहेब कोल्हे यांनी परिश्रम घेतले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले.
COMMENTS