आळेफाटा (वार्ताहर) राजुरी ( ता जुन्नर )येथील निर्भिड, निःपक्ष, उच्चशिक्षित व सर्वकालिक उत्तम पत्रकार, प्रशासनाचे व कायद्याचे उत्तम जाणकार ना...
आळेफाटा (वार्ताहर)
राजुरी ( ता जुन्नर )येथील निर्भिड, निःपक्ष, उच्चशिक्षित व सर्वकालिक उत्तम पत्रकार, प्रशासनाचे व कायद्याचे उत्तम जाणकार नामदेवराज पवार यांची "अखिल मराठी सतर्क पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य" च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.यामध्ये राजुरी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, समर्थ शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके, शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम डी घंगाळे, माजी सभापती दीपक औटी, प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे वतीने महेशभाई गुंजाळ, ज्येष्ठ शिक्षक सोनवणे सर, सामाजिक कार्यकर्ते विशाल गडगे आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
आगामी काळात पत्रकार सरंक्षण, पत्रकार विमा आणि आरोग्य विमा सरंक्षण, पत्रकार भवन निर्मिती, पत्रकारांसाठी घरकुल योजना, पत्रकारांना पेन्शन योजना, अधिस्वीकृती धारक पत्रकारांची संख्या वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे, मार्गदर्शन करणे, पत्रकार बांधवांसाठी कार्यशाळा आयोजित करणे, पत्रकारांची एकजूट करून त्यांच्या विविध अडीअडचणी सोडविणे आदी विषयांवर पत्रकार संघ अध्यक्ष या नात्याने प्रश्न सोडविणार असल्याचे राज्यध्यक्ष नामदेवराज पवार यांनी नमूद केले.
COMMENTS