सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट च्या माध्यमातून श्री क्षेत्र लेण...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट च्या माध्यमातून श्री क्षेत्र लेण्याद्री डोंगर सुशोभीकरण अभियान सुरू झाले असून स्वच्छ, सुंदर आणि हरित लेण्याद्रीचा संकल्प येथील विश्वस्त मंडळाने केला आहे .
या उपक्रमाला विविध संस्थांचे सहकार्य मिळत असून. आज रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या फुल झाडांची लागवड करण्यात आल्याची माहिती लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री जितेंद्र बिडवई व रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी दिली.
अष्टविनायक तीर्थक्षेत्र गिरीजात्मज लेण्याद्री ता. जुन्नर, जि. पुणे येथील लेण्याद्रीच्या डोंगर उताराला लेण्याद्री देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून गणेशवन, वन औषधी वन, नक्षत्र वन,देवराई, व दर्शन मार्गाच्या दुतर्फा विविध प्रकारची फुलझाडे व फळझाडे लावण्यात येणार आहेत.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून पाच जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नुकतेच लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट च्या माध्यमातून श्री क्षेत्र लेण्याद्री डोंगर सुशोभीकरण अभियान या उपक्रमाचे उद्घाटन विविध वृक्ष रोपांची लागवड करून करण्यात आले. रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांच्या पुढाकाराने दोन्हीही संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या फुल झाडांची व वृक्षांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, डिसेंट फाउंडेशनचे सचिव फकीर आतार, जेष्ठ नागरिक संघ जुन्नर तालुका समन्वय समिती अध्यक्ष प्रा. एकनाथ डोंगरे, रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे खजिनदार रो. नारायण आरोटे, रो. नितीन भुजबळ, रो.धनाजी बोरकर , रो.ओंकार मेहेर, ज्येष्ठ शिक्षण विचारवंत रो. रामभाऊ सातपुते, रो. रमेश मेहेत्रे (अर्थसंपदा पतसंस्था नारायणगाव), रो.दिलीप भगत (हायस्पीड कॉम्प्युटर्स, नारायणगाव), संदीप ताजने, रमेश मेहेर, योगेश वाघचौरे, सौ. वैशाली फुलसुंदर, ज्ञानश्री फुलसुंदर, नीलिमा भुजबळ, सोनाली आरोटे इत्यादी रोटेरियन उपस्थित होते.
या उपक्रमासाठी देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी व भारतीय पुरातत्व विभागाचे कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
COMMENTS