सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) डिसेंट फाउंडेशन, जुन्नर व रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या संयुक्त विद्यमाने एक आधाराची काठी आजी-आजोबा...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
डिसेंट फाउंडेशन, जुन्नर व रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या संयुक्त विद्यमाने एक आधाराची काठी आजी-आजोबांसाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई व रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष प्रा .डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी दिली.
अलदरे, लेण्याद्री ता. जुन्नर येथील २९ गरजू व वयोवृद्ध आजी आजोबांना आधारच्या काठ्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या वेळी अलदरे गावातील सुमारे शंभर वयोवृद्ध व्यक्ती व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. अलदरे गावच्या सरपंच सौ सविता सरजीने व प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर व मान्यवरांच्या हस्ते उपस्थितांना काठयांचे वाटप करण्यात आले.
सध्या तालुक्यातील वयोवृद्ध व्यक्तींसाठी समाजातील दातृत्ववान व्यक्तींच्या आधाराने एक आधाराची काठी आजी-आजोबांसाठी हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला जात आहे. त्यासाठी रोटरी क्लब नारायणगाव हायवेने देखील आज मोलाचे आर्थिक सहकार्य केल्याचे जितेंद्र बिडवई म्हणाले.
रो. प्रा.डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी यावेळी रोटरी वर्ष 2022- 23 या वर्षात जुन्नर तालुक्यात केलेल्या सामाजिक कार्यांचा आढावा घेऊन रोटरी क्लब आंतरराष्ट्रीय स्तरावर करत असलेल्या कार्यांचा आढावा घेतला.
अलदरे गावच्या सरपंच सौ सविता सरजिने यांनी डिसेंट फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून अलदरे गावामध्ये ज्येष्ठ व वृद्ध व्यक्तींसाठी आरोग्य शिबिरे तसेच गावासाठी स्वच्छता अभियान राबविताना डिसेंट फाउंडेशनचे होणारे सहकार्य याबद्दल कौतुक केले.
यावेळी रोटरी क्लब नारायणगाव हायवे चे अध्यक्ष प्रा.डॉ. श्रीकांत फुलसुंदर, डिसेंट फाउंडेशन चे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव फकीर आतार,जेष्ठ नागरिक संघ जुन्नर तालुका समन्वय समिती अध्यक्ष प्रा. एकनाथ डोंगरे, रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे रोटेरियन नारायण आरोटे, ओमकार मेहेर, नितीन भुजबळ, धनाजी बोरकर, रामभाऊ सातपुते, अलदरे चे माजी सरपंच निलेश सरजिने, खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष सरजिने, रमेश मेहेर, योगेश वाघचौरे, रमेश मेहत्रे, संदीप सरजिने, ग्रामस्थ व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते दीपक सरजिने यांनी केले तर आभार पोलीस पाटील सुमित लोहोटे यांनी मानले.
COMMENTS