प्रतिनिधी : नवनाथ मोरे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ घोडेगाव : शहिद राजगुरू ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय, फलोदे व ललित कला...
प्रतिनिधी : नवनाथ मोरे
दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ
घोडेगाव : शहिद राजगुरू ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय, फलोदे व ललित कला मंदिर व सार्वजनिक विश्वस्त निधी यांच्या वतीने, फलोदे व सावरली गावातील इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम आज शहीद राजगुरू ग्रंथालय येथे पार पडला.
या कार्यक्रमासाठी फलोदे, सावरली गावचे माजी सरपंच अशोक पेकारी, फलोदे गावचे पोलीस पाटील विजय मेमाणे, सामाजिक कार्यकर्त्या लिलाबाई मेमाणे, ग्रामस्थ शंकर केंगले, संदिप शेळके इ.मान्यवर उपस्थीत होते. मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावी मध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना बॅग देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वह्या व पेन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय मेमाणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीचे भान ठेवून खूप अभ्यास केला पाहिजे. मोबाईलचा अति वापर टाळावा. व्यसनाच्या आहरी जाऊ नये, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक पेकारी म्हणाले, विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून खूप अभ्यास करून ध्येय प्राप्त करावे. मनात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न ठेवता शिक्षण पूर्ण करावे. ध्येय्य निश्चित करावे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अवांतर वाचन करून ज्ञानात भर पाडली पाहिजे. त्यासाठी ग्रंथालयात येवून विविध प्रकारची पुस्तके वाचली पाहिजे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास मेमाणे यांनी केले. प्रास्तविक अशोक जोशी यांनी केले तर रेखा शेळके यांनी आभार मानले. शहीद राजगुरू ग्रंथालयाने स्थानिक संयोजन केले.
COMMENTS