प्रतिनिधी : नवनाथ मोरे निमगिरी : लायन्स क्लब ऑफ जुन्नर, शिवनेरीच्या वतीने जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील न्यू इंग्लिश ...
प्रतिनिधी : नवनाथ मोरे
निमगिरी : लायन्स क्लब ऑफ जुन्नर, शिवनेरीच्या वतीने जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील न्यू इंग्लिश स्कूल, निमगिरी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक अप्रतिम स्कूल बॅग व १० फूलस्केप वह्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ जुन्नर, शिवनेरीचे अध्यक्ष लायन संतोष रासने, लायन मिलिंद झगडे, लायन नरेंद्र गोसावी, लायन योगेश रायकर, लायन राजेंद्र देसाई, लायन संजय शिंदे व लायन बंटी काजळे उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते या शैक्षणिक साहित्याचे सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष संतोष रासने व मिलिंद झगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन संतोष रासने होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक लांडे एस. टी. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्ष निवड केली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केंद्रे डी. एस. यांनी केले. आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक मानकर डी. बी. यांनी केले. याप्रसंगी लेखनिक व्ही. एस.भालेराव, आर.बी.वाकचौरे, प्रयोगशाळा परिचर उत्तम मोरे उपस्थित होते.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
COMMENTS