सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) ग्रामीण भागात राहूनही राज्याच्या स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणुन नावलौकिक मिळवले...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
ग्रामीण भागात राहूनही राज्याच्या स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणुन नावलौकिक मिळवलेले आणि सदैव सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असणाऱ्या गणपुले सरांचे योगदान मोलाचे आणि इतराना प्रेरणादायी आहे. असे गौरवोद्गार राज्याचे माजी शिक्षण संचालक श्री दिगंबर देशमुख यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
बोरी खुर्द येथील गुरुवर्य एकनाथ गोविंद देव प्रशालेच्या ३५ वा वर्धापन दिन आणि महेंद्र गणपुले यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभात ते बोरी खुर्द येथे बोलत होते.
श्री महेंद्र गणपुले हे ३५ वर्षाच्या मुख्याध्यापक पदाच्या सेवेतून ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रशालेच्या आजी माजी विद्यार्थ्यांचे तसेच जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वागदरे, ग्रामस्थ उमाजी काळे, तहसीलदार रवींद्र सबनीस, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माऊली खंडागळे, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे, माजी उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण, माजी शिक्षणाधिकारी प्रकाश परब यांची गौरवपर मनोगते झाली.
संस्थेच्या वतीने तसेच माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान चिन्ह आणि मानपत्र देऊन महेंद्र गणपुले यांचा गौरव करण्यात आला त्यांच्या जीवन प्रवासाची चित्रफित दाखवण्यात आली तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर खासदार सुप्रिया ताई सुळे आणि चित्रपट अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या ऑनलाइन शुभेच्छा पण दाखवण्यात आल्या. माजी मुख्याध्यापक सु. कृ. गोसावी, माजी उपशिक्षणाधिकारी बजरंग आवारी तसेच गणेश राऊत, नीलेश काशिद, पंकज घोलप, संजय बाठे, अशोक काकडे, संतोष ढोबळे आदी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक विक्रम शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन संपत बांगर यांनी केले. श्री पटेल सर यांनी आभार प्रदर्शन केले.
COMMENTS