प्रतिनिधी : शरद शिंदे आज गुरूवार दिनांक १५ जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळ...
प्रतिनिधी : शरद शिंदे
आज गुरूवार दिनांक १५ जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी नवागत विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
फुगे, गुलाब पुष्प, पाठ्यपुस्तके, गणवेश, दप्तर, शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप करुन सर्वच विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
दुर्ग संवर्धन संस्थेमार्फत एफिनिटी एक्स कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना दप्तरे, तर मा. मंगेश नामदेव शेटे व निलेश रोहिदास चतुर यांचे वतीने सर्व विद्यार्थ्यांना चित्रकला वही व रंगपेटी देण्यात आली. मा. सलमान इनामदार, मा.महेंद्र चव्हाण व मा. महेश मातेले यांचे वतीने प्रत्येकी पाच डझन वह्या देण्याचे जाहीर करण्यात आले. शाळेतील उपशिक्षिका मा. मंगल मरभळ यांचे वतीने विद्यार्थ्यांना लाडूचे गोड जेवण देण्यात आले.
या वेळी सुराळे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, विविध पदाधिकारी, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक खंडेराव ढोबळे सर यांनी तर नियोजन पंढरीनाथ उतळे सर, मंगल मरभळ मॅडम व दे.ल. भांगे सर यांनी केले.
COMMENTS