क्राईमनामा Live : समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे (बांगरवाडी) येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या व...
क्राईमनामा Live : समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे (बांगरवाडी) येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या "पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह २०२३" अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थ्यांची एल अँड टी,चाकण (पुणे) या नामांकित कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.
समर्थ पॉलिटेक्निक च्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागांतर्गत पूल कॅम्पस २०२३ द्वारे विविध महाविद्यालयातील ३४ विद्यार्थ्यांची निवड केल्याची माहिती एल अँड टी कंपनीचे गोरक्षनाथ औटी यांनी दिली.
या पूल कॅम्पस ड्राइव्ह मध्ये जुन्नर, आंबेगाव, अकोले व संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.
एल अँड टी कंपनीच्या वतीने मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया गोरक्षनाथ औटी, एच आर सतीश चिगारे, महेंद्र रटाटे यांनी तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाची निवड प्रक्रिया कंपनीचे एच आर हर्षदा कलंत्री, नवीन गुप्ता, क्षीजीत श्रीकुमार यांनी पूर्ण केली.
समर्थ संकुलातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे :
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग-
साक्षी अदक, अनुजा अदक, श्रेयस बढे, प्रवीण घोलप, निखिल खराडे, उत्तम काशिद, संकेत शिंदे, ओंकार माळी, यश सरोदे
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग-
शोएब पटेल, पवन गुंजाळ, वैभव भालेराव, अभिषेक तट्टू,आकाश अडागळे, गणेश रणपिसे, हरेश्वर भांड.
सदर प्लेसमेंट साठी ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.संकेत विघे, शैक्षणिक समन्वयक प्रा.संजय कंधारे विभाग प्रमुख प्रा.आदिनाथ सातपुते, प्रा.महेंद्र खटाटे, प्रा.संदीप त्रिभुवन, प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर, प्रा.हुसेन मोमीन प्रा.आशिष झाडोकर, प्रा.माधवी भोर आदींनी परिश्रम घेतले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले.
COMMENTS