आरोग्य टिप्स : उन्हाळा ऋतूमध्ये गर्मीचे प्रमाण खूप वाढलेले असते. त्यामुळे या दिवसांमध्ये घराबाहेर पडणे कठीण होते (Summer Care Tips). तसेच ...
आरोग्य टिप्स : उन्हाळा ऋतूमध्ये गर्मीचे प्रमाण खूप वाढलेले असते. त्यामुळे या दिवसांमध्ये घराबाहेर पडणे कठीण होते (Summer Care Tips).
तसेच या काळात आपल्या संपूर्ण शरीराला देखील अतिप्रमाणात घाम येत असतो. (Hair Care Tips) त्यामुळे आपले केस धुवूनही खूप तेलकट दिसतात. त्यामुळे या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण आपल्या केसांची काळजी (Hair Care Tips) कशा प्रकारे घ्यायची या बद्दल माहिती सांगणार आहोत (How To Keep Hair Healthy In Summer Know Tips).
– केस नियमितपणे ट्रिम करा (Trim Hair Regularly)
केस निरोगी ठेवण्यासाठी नियमित ट्रिमिंग आवश्यक आहे. यामुळे केसांना फाटे फुटण्याची समस्या होणार नाही आणि केस निरोगी राहतील. (Hair Care Tips)
– केसांना स्वच्छ ठेवा (Keep Hair Clean)
उन्हाळ्याच्या दिवसात केसांमध्ये जास्त घाण आणि घाम साचतो. अशा वेळी केस स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. विशेषत: ज्यांचे केस तेलकट (Oily Hairs) आहेत किंवा ज्यांना जास्त घाम येतो, त्यांनी टाळू स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी केस धुतले पाहिजे.
– केस धुण्यापूर्वी तेल लावा (Apply Oil Before Washing Hair)
धुण्यापूर्वी, नारळ किंवा कोणतेही तेल (Coconut Oil) केसांना लावा. आपल्या केसांना तेलाने मसाज केल्यानंतर किमान एक तासा नंतरच केस धुवा. तुमचे केस खूप कोरडे असल्यास आदल्या दिवशी रात्री तेलाने मसाज करा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू (Shampoo) करा. यामुळे तुमच्या केसांना चांगला ओलावा मिळेल.
– केस झाकून ठेवा (Cover The Hairs)
उन्हाळ्यातील सूर्यप्रकाशामुळे (Sunlight) तुमचे केस खराब (Hair Damage) होऊ शकतात.
त्यामुळे अशा परिस्थितीत, आपण आपले केस टोपी किंवा छत्रीने झाकणे आवश्यक आहे.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
COMMENTS