गडचिरोली : लग्नाला गेलेले कुटुंब घरी परतत असताना अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबले होते. झाडावर वीज पडल्...
गडचिरोली : लग्नाला गेलेले कुटुंब घरी परतत असताना अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबले होते. झाडावर वीज पडल्यामुळे आई-वडील आणि दोन मुलीसह चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
संपूर्ण कुटुंबच मृत्युमुखी पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आमगाव (ता. देसाईगंज) येथील भारत राजगडे आपली पत्नी आणि दोन लहान मुलींसह कुरखेडा येथे नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. लग्न समारंभ आटपून परतत असताना तुळशीपाट्याजवळ मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी चौघेही एका झाडाखाली थांबले. पण, त्या झाडावर वीज पडल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील एकाच वेळी चौघांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यातही विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची स्थिती जैसे थे राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पुन्हा एकदा मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
COMMENTS