पुणे : सासवड येथील बांधकाम व्यवसायिक सुनील नाना जगताप यांच्या मुलीचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. अनुष्का जगताप (वय २...
पुणे : सासवड येथील बांधकाम व्यवसायिक सुनील नाना जगताप यांच्या मुलीचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. अनुष्का जगताप (वय २१) असे मृत युवतीचे नाव आहे.
या घटनेने सासवड परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.
सासवड परिसरात जगताप हे बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहे. २ एप्रिल रोजी ते आपल्या कुटुंबीयांसोबत आपल्या नवीन बांधलेल्या इमारतीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत अनुष्का देखील गेली होती. मात्र फोन आला म्हणून ती गडबडीत खाली येत असताना ती पडली. त्यात तिला गंभीर दुखापत झाली होती. तिला उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर मार लागल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अनुष्काने सासवडच्या वाघिरे महाविद्यालयातून बीएसस्सी पदविका पूर्ण केली होती. तिच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक शरद जगताप यांची अनुष्का पुतणी होती. अनुष्काच्या निधनाने तिच्या मित्र परिवारात दुःख पसरले असून सर्वांना धक्का बसला आहे.
COMMENTS