पिं परी-चिंचवडः मौजे शिरगाव (ता. मावळ , जि. पुणे) येथे प्रती शिर्डी मंदिरासमोर गावचे सरपंचावर कोयत्याने वार करुन पळून गेलेले आरोपींना अट...
पिंपरी-चिंचवडः मौजे शिरगाव (ता. मावळ, जि. पुणे) येथे प्रती शिर्डी मंदिरासमोर गावचे सरपंचावर
कोयत्याने वार करुन पळून गेलेले आरोपींना अटक करण्यात शिरगाव परंदवडी पोलिसांना यश
आले आहे.
शिरगाव
परंदवडी पोलिस स्टेशन हद्दीमधील मौजे शिरगाव, प्रति
शिर्डी मंदिराचे समोर रोडवर (ता. मावळ, जि. पुणे)
येथे गावचे सरंपच प्रविण साहेबराव गोपाळे (रा शिरगाव, ता. मावळ जि. पुणे) हे मंदिराचे समोर यांचे मोटार सायकल वर
बसलेले असताना गाडीवर ०३ अज्ञातांनी येवून त्यांच्यावर धार धार कोयत्याने वार करुन
निर्घृण खून करुन मोटार सायकलवरून फरार झाले होते. शिरगाव परंदवडी पोलिस स्टेशन
गु. रं. नं. ९६ / २०२३ भादवी ३०२, १२० (ब), ३४ प्रमाणे दिनांक ०१/०४/२०२३ रोजी गुन्हा दाखल आहे.
सदरची
कारवाई पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह. पोलिस
आयुक्त मनोजकुमार लोहिया, अपर पोलिस
आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलिस उप
आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहा. पोलिस
आयुक्त, देहुरोड विभाग, पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक
शिरगाव परंदवडी पो.स्टे. वनिता एस धुमाळ, पोउपनि
गाडीलकर, पोहवा / ४७१ टी. सी. साबळे, पोना / १२३१ एस. बी. घाडगे पोना/१२५० वाय. जे. नागरगोजे, पोअंम / २२४१ एस. एल. फडतरे व पोअंम / २५७६ डी व्ही राठोड
यांनी केली आहे.
COMMENTS