मुंबईः अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (ता. १६) महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामुळे राज...
मुंबईः अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (ता. १६) महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील विविध ठिकाणांहून लाखो जण नवी मुंबई येथे येणार आहेत.
वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (ता. १६) महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सदरचा गौरव सोहळा खारघर नवी मुंबई येथे असल्याने सदर कार्यक्रमाकरीता रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार वगैरे जिल्हातून तसेच बाहेरील राज्यातून सुमारे १५ ते २० लाख सदस्य / अनुयायी खाजगी वाहनांने एसटी बसेस तसेच रेल्वेने खारघर नवी मुंबई येथे येणार आहेत.
सद्यस्थितीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर चौपदरीकरणाचे कामकाज चालू असल्यामुळे सदर महामार्गावर विविध ठिकाणी बोटलनेक पीईट तयार झालेले आहेत. १४.०४.२०१३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी असून १५.०४. २०२३ व १६.०४.२०१३ रोजी शनिवार व रविवार अशी लगातार ३ दिवस सार्वजनिक सुट्टी असल्याने नागरिक व पर्यटक तसेच सदस्य अनुयायी हे मोठया संख्येने आपआपली वाहने घेवून सदर मार्गावरून प्रवास करणार आहेत. अशा वेळेस सदर मार्गावरून अवजड वाहतुक सुरु राहिल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊन गंभीर प्रश्न उद्भवू शकतो.
मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ११५ मधील तरतुदींचा वापर करुन महाराष्ट्र शासन या आदेशाद्वारे सार्वजनिक हितास्तव खारघर ते इन्सूली (सांवतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जूना राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर राज्यीय मार्ग वरुन वाळूने भरलेले ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत बदल करण्यात आले आहेत.
१४.०४.२०२३ रोजी १२.०० वाजल्यापासून ते दिनांक १६.०४.२०२३ रोजी १२.०० वाजेपर्यंत वरील महामार्ग व इतर राज्य मार्गवर सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे. (जड अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ, वाहने) अशा सर्व वाहनांची वाहतूक बंद राहील. वरील निषेध दुध, पेट्रॉल-डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर लिक्वीड मेडिकल ऑक्सीजन, औषधे व भाजीपाला इ. जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू होणार नाहीत. उपरोक्त महामार्ग/राज्य मार्ग च्या रस्तारुंदीकरण, रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य माल इत्यादी ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. तथापि, वाहतूकदारांनी सबंधीत वाहतूक विभाग/महामार्ग पोलिस यांचेकडून प्रवेशपत्र घ्यावे, असे आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार करण्यात आले आहे.
COMMENTS