धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. पहिल्या घटने...
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. पहिल्या घटनेत २९ मार्च रोजी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात राहणारी १७ वर्षीय मुलगी घरी एकटी होती काही कामानिमित्त दुपारी घराला कुलूप लावून घराबाहेर पडली, ती परतलीच नाही.
कुटुंबियांनी तिचा शोध घेवूनही ती सापडली नाही. तर, दुसऱ्या घटनेत लोहारा शहरात राहणारी १६ वर्षीय मुलगी दुपारी स्टेशनरी साहित्य आणण्यासाठी घराला कुलूप लावून घराबाहेर पडली पण ती काही परतली नाही. या प्रकरणी दोघींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील एका गावातून एका अल्पवयीन मुलीला (नाव गाव गोपनीय) अज्ञाताने फुस लावून पळवुन नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून उस्मानाबाद (धाराशिव) ग्रामीण पोलिस ठाण्यात भा.दं.सं. कलम ३६३ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, २८मार्च रोजी शेतातील ज्वारी काढण्यासाठी मुलीचे आई वडील आणि भाऊ हे तिघे शेतात गेले होते आणि घरी मुलगी एकटीच होती. ज्वारी काढून संध्याकाळी ०६:३० वा.सु. ते घरी आल्यावर त्यांना घराला कुलूप दिसले त्या नंतर त्यांनी घर उघडले आणि मुलगी इथेच कुठे तरी गेली असेल असे म्हणून त्यांनी वाट पाहिली. मात्र, रात्र झाली तरी पण मुलगी काही घरी आली नाही. सगळीकडे मुलीला शोधले पण ती काही मिळून आली नाही. त्याच दिवशी मुलीला दुपारी रस्त्याकडे जात असताना एका महिलेने बघितले होते. या बाबत त्यांनी अधिक माहिती घेतल्यावर त्यांना असे समजले की, एक मुलाने (नाव गाव गोपनीय) लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले आहे. अशी तक्रार त्यांनी उस्मानाबाद (धाराशिव) ग्रामीण पोलिस ठाण्यात ३० मार्च रोजी दिली. त्या नुसार दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध भा.दं.सं. कलम ३६३ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत लोहारा शहरातून एका अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून लोहारा पोलिस ठाण्यात भा.दं.सं. कलम ३६३ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, मुलीचे आई वडील हे कामासाठी बाहेर गेले होते. तेव्हा सकाळी ११ वा.सु. घराला कुलूप लावून मुलगी स्टेशनरी साहित्य आणण्यासाठी बाहेर गेली होती. त्या नंतर दुपारी १२:३० वा.सु. तिची आई घरी आली आणि बघितले तर घराला कुलूप होते. तेव्हा तिने इकडे तिकडे शोधाशोध केली नातेवाईकांकडे विचारपूस केली पण मुलगी काही मिळून आली नाही. तेव्हा माझ्या मुलीला कोणी तरी फुस लावून पळवून नेले आहे अशी तक्रार त्यांनी लोहारा पोलिस ठाण्यात ३१ मार्च रोजी दिली. त्या नुसार दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध भा.दं.सं. कलम ३६३ अंतर्गत गुन्हा नोंदवला असुन पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS