क्राईमनामा लाईव- जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बेलसर ते भिवाडे या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन...
क्राईमनामा लाईव- जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील
बेलसर ते भिवाडे या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास
सहन करावा लागत आहे, वास्तविक बेलसर पासून ते घंगाळदरे व भिवाडे व इंगळून या रस्त्याच्या
काही ठिकाणच्या दोन्ही बाजू गवत व बाभळीच्या काटेरी झुडपांनी झाकून गेल्या आहेत.
तसेच घंगाळदरे फाटा येथील बाजूच्या शेतकऱ्याने रस्त्याच्या
कडेची संपूर्ण बाजू जेसीबीच्या सहाय्याने खोदली असून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या
अंतर्गत येत आहे, मात्र सदर इसमाने येथील रस्त्याची बाजू परवानगी न घेता खोदली आहे,
या गोष्टीची सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दखल घेवून सदर इसमावर कारवाई करावी अशी
मागणी होत आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
खरं तर या रस्त्याची पुरती दुर्दशा झालेली आहे, काही
ठिकाणी रस्त्यांना मोठ मोठे खड्डे देखील पडलेले आहेत, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना
साईडपट्ट्या नसल्याने व रस्ता अरूंद असल्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी
कसरत करावी लागत आहे.
मागील तीन महिन्यांपूर्वी ठेकेदाराने या रस्त्याची
तात्पुरती डागडूजी केली होती, मात्र सध्याची अवस्था फार बिकट आहे, दोन महिन्यांवर
पाऊस येऊन ठेपला असून या रस्त्यावर व्यवस्थितरित्या डांबर व खडीकरण करण्याची गरज असताना
ठेकेदार व लोकप्रतिनिधी या गोष्टीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत, या भागातील रस्ते
वर्दळीच्या प्रवाहात असल्याने येथे खडी व डांबर दाट स्वरूपात टाकण्याची गरज आहे, मात्र
वरवरची मलमपट्टी केल्यावर हा रस्ता पुन्हा जैसे थे होत आहे.
सदर ठिकाणावरून आंबेहातविज, सुकाळवेढे, घंगाळदरे,
ही पर्यटनक्षेत्रे आहेत, येथे पर्यटक व भाविक मोठ्या संख्येने येत जात असतात, मात्र
रस्त्याची अवस्था बिकट असल्याने पर्यायाने सुराळे मार्गाने ते पर्यटक जात असतात.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूची काटेरी झाडे व गवत
तसेच गटारांची खोली करून साईडपट्ट्या चांगल्या कराव्यात ही वाहनचालक व प्रवाशांची
मागणी आहे.
COMMENTS