आरोग्य टिप्स : उन्हळ्यात जास्त घाम येत असल्याने त्वचेची रंध्रे (पोअर्स) मोकळी होतात. पोअर्स ओपन राहिल्याने त्यातून सीबम जास्त प्रमाणात बाहेर...
आरोग्य टिप्स : उन्हळ्यात जास्त घाम येत असल्याने त्वचेची रंध्रे (पोअर्स) मोकळी होतात. पोअर्स ओपन राहिल्याने त्यातून सीबम जास्त प्रमाणात बाहेर पडते आणि पिंपल्स, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स, सुरकुत्या यांसारख्या त्वचेच्या समस्या निर्माण होतात.
ओपन पोअर्स कमी करून घट्ट करण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय
ओपन पोअर्सचा (open pores) आकार कमी करण्यासाठी चेहरा नियमितपणे स्वच्छ करावा.
डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी योग्य आणि योग्य पद्धतीने स्क्रब लावावे.
दोन चमचे ओट्स आणि चमचाभर गुलाबपाणी, मध यांचे एकत्र मिश्रण बनवून चेहऱ्याला लावावे. १० मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका.
आठवड्यातून दोनदा केळ स्मॅश (कुस्करून) करून चेहर्यावर लावा.
चेहऱ्याला दही लावा. आणि १० मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात. हा उपाय तुम्ही आठवड्यातून ३ वेळा करा.
१ चमचा हळदीमध्ये १ चमचा गुलाबपाणी किंवा दूध मिसळा आणि त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा.
काकडीचा रस चेहऱ्याला लावा. २०-२५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा.
COMMENTS