आरोग्य टिप्स : उन्हाळ्यात आजारांचे प्रमाण वाढत असल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणे गरजेचे असते. पुरेशी झोप घेणे, धूम्रपान सोडणे, नियमित व...
आरोग्य टिप्स : उन्हाळ्यात आजारांचे प्रमाण वाढत असल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणे गरजेचे असते. पुरेशी झोप घेणे, धूम्रपान सोडणे, नियमित व्यायाम करणे, निरोगी शरीर राखणे आणि अल्कोहोलचे सेवन टाळणे ही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे मुख्य मार्ग आहेत. पण योग्य आहारासह अन्य काही पदार्थ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतात. (summer Immunity Boosting Foods)
हे आहेत ते पदार्थ
– ताक
शरीरास ताजेतवाने ठेवणारे हे पेय उन्हाळ्यात खूप फायदेशीर मानले जाते. ताकामध्ये असलेले लैक्टिक ऍसिड रोगप्रतिकारक प्रणालीच्या सुरळीत करते. ताक हे एक कॅल्शियमयुक्त देशी पेय आहे. ताक किंवा छासमध्ये सेंधव मीठ, मिरपूड, पुदिन्याची पाने आणि इतर मसाले घालू उन्हाळ्यात पिऊ शकता.
– फळे
द्राक्ष, लिंबू, संत्री अशा पदार्थांचा समावेश रोजच्या आहारात करावा. या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
– ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये एपिगॅलोकाटेचिन गॅलेट असते, जे रोगाशी लढणारे अँटिऑक्सिडेंट तयार करते. ग्रीन टी केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही वापरली जाते.
– बदाम
बदाममधील पोषक तत्वे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. बदाममध्ये व्हिटॅमिन ई, झिंक, मॅग्नेशियम आणि प्रथिने आहेत. जी रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यास चालना देतात.
– हळद
हळदीमध्ये कर्क्युमिन हा गुणधर्म असून जो रोगप्रतिकारक कार्यास चालना देतो. तुम्ही रोज हळद घालून दूध पिऊ शकता. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. याशिवाय लसूण, आले, किवी, पपई, ब्रोकोली, पालक, दही, भोपळी मिरची आणि बिया आणि काजू हे पदार्थ देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)
COMMENTS