जुन्नर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटातील शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे अनुसूचित जाती जमातीचे उमेद्वार जनार...
जुन्नर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटातील शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे अनुसूचित जाती जमातीचे उमेद्वार जनार्दन मरभळ यांनी बाजी मारली असून, त्यांना एकूण ४७३ एवढी भरघोस मते मिळून ते विजयी झाले आहेत.
त्यांच्या विरोधातील उमेद्वारांना गोविंद साबळे यांना ३९७ मते पडली असून देवराम मुंढे यांना ८२ मते पडल्याने त्यांचा दारूण पराभव झाला आहे.
जनार्दन मरभळ हे शेतकरी गरीब कुटुंबातील व्यक्तीमत्व असून त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे, ते ग्रामपंचायत बोतार्डे येथे सदस्य देखील आहेत.
त्यांचा विजय झाल्याने बोतार्डे व जुन्नर येथील त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष करत जनार्दन मरभळ यांचे जंगी स्वागत केले.
COMMENTS