जुन्नर- जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील घाटघर ता. जुन्नर जि. पुणे या ठिकाणी सोमवार दिनांक १७ एप्रिल २०२३ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार...
जुन्नर- जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील घाटघर ता. जुन्नर जि. पुणे या ठिकाणी सोमवार दिनांक १७ एप्रिल २०२३ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. भिमराव रामजी आंबेडकर अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या जल्लोषात व उत्साहात संपन्न झाली.
या जयंती
महोत्सवानिमित्त सकाळी १० वाजता पंचशिल ध्वजारोहण व बुध्दवंदना झाली. सकाळी ११ वाजता
शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व चहापान देण्यात आला. सायंकाळी ४ नंतर डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
सायंकाळी
७ वाजता प्रमुख वक्ते सचिन भोजने यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक योगदान
या विषयावर सुंदर असे व्याख्यान झाले.
कार्यक्रमप्रसंगी
प्रमुख पाहुणे म्हणून सुनिताताई बोऱ्हाडे ( ता. उपप्रमुख महिला शिवसेना ), पोपट रावते
( मा. सरपंच ), मारूती वारे ( तळेचीवाडी ), अनिल सोनवणे ( जळवंडी ), पोपट वाघमारे
( पीएस आय ), बाळू खरात ( बोतार्डे ), नंदूशेठ पानसरे ( तालुका उपप्रमुख शिवसेना ),
दिलीप वाघमारे, मधुकर वाकचौरे ( सा. कार्यकर्ते ), जोगदंड साहेब, मनोज नांगरे ( सरपंच
ग्रा. पं. घाटघर ) सुमन सुभाष आढारी ( उपसरपंच ), शैला रावते ( पो. पाटील ), राघु
रावते ( तंटामुक्ती अध्यक्ष ), अनिल रावते ( पे. अध्यक्ष ), मारूती रावते ( फॉ. वॉचमेन
) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे
आयोजक – संस्थापक - कोंडू येसू खरात गुरूजी, डी आर. वारे ( सल्लागार ), पुरूषोत्तम
खरात ( अध्य़क्ष, अॅड. अर्जुन खरात ( सचिव ) मळीबा खरात, पोपट खरात ( उपाध्यक्ष ),
सुनिल खरात, सुधिर खरात ( सहसचिव ), बाळू खरात ( खजिनदार ), कोंडू खरात, चंद्रकांत
खरात, राजू खरात, मळीबा खरात, अर्जुन खरात, अशोक खरात, फकिर खरात, गौतम खरात, रमेश
खरात, बाप्पु खरात, विजय खरात, बाळू खरात, धोंडू वारे, हरिभाऊ खरात, सुधीर खरात तसेच
कार्यक्रमाचे संयोजन माता रमाई महिला बचत गट घाटघर, ग्रुप ग्रामपंचायत घाटघर, आंबशेत
वस्ती, फांगुळगव्हाण, मळगंगा माता क्रिकेट क्लब तरूण मंडळ घाटघर यांचे मोलाचे सहकार्य
लाभले.
या कार्यक्रमाचे
अध्यक्ष पोपट रावते हे होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. आर. वारे ( मुख्याधिकारी
पाणीपुरवठा ) यांनी मांडले, तर सूत्रसंचालन सतिश शिंदे यांनी केले.
समारोप
झाल्यानंतर भोजनाची व्यवस्था केली होती.
यानंतर
कार्यक्रमात जय मल्हार स्वर सायली प्रस्तुत भिमगीत-लोकगीते ऑर्केस्टा संपन्न झाला.
COMMENTS