आरोग्य टिप्स : टी ट्री ऑईल हे त्या झाडाच्या पानांपासून बनविले जाते. टी ट्री ऑईलचे अनेक फायदे आहेत. मात्र ते वापरण्याचे काही नियम आहेत. टी ट्...
आरोग्य टिप्स : टी ट्री ऑईल हे त्या झाडाच्या पानांपासून बनविले जाते. टी ट्री ऑईलचे अनेक फायदे आहेत. मात्र ते वापरण्याचे काही नियम आहेत. टी ट्री ऑईलचे कधीही सेवन करू नये. ते फक्त शरीराच्या बाह्यभागावर वापरावे.
टी ट्री ऑईल कोणत्यातरी कॅरियर तेलात मिक्स करून मगच वापरावे. जाणून घ्या टी ट्री ऑईलचे फायदे –
मुरूमांची समस्या दूर होते-
तुमच्या चेहऱ्यावर जर मुरूम झाले असतील तर, टी ट्री ऑईलचा वापर करा. टी ट्री ऑईलमध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात.
जखम भरण्यास मदत-
एखाद्याला खेळताना वा काही करताना जखम झाली असेल तर टी ट्री ऑईल वापरा. कारण टी ट्री ऑइल जखम लवकर भरण्यास मदत करते. यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे जखमेतील संसर्गजन्य जीवाणू नष्ट होतात आणि जखम भरण्यास मदत करते.
फंगल इन्फेक्शन दूर ठेवण्यास मदत-
टी ट्री ऑईलचा आणखी एक फायदा म्हणजे फंगल इन्फेक्शन दूर ठेवते. तुमच्या नखांमध्ये फंगल इन्फेक्शन झाले असेल तर टी ट्री ऑइल घ्या. त्यात नारळ तेलाचे दोन थेंब टाका. नंतर ते त्या भागावर लावा.
तेलकट त्वचेची समस्या दूर करते-
अनेकांना तेलकट त्वचाची समस्या जाणवते. त्यामुळे अनेक पर्याय अवलंबवले जातात. तुम्हालाही अशी समस्या जाणवत असेल तर टी ट्री ऑईलचा वापर करा. टी ट्री ऑईलमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात त्यामुळे त्वचेतील सेबमचे प्रमाण कमी होते.
COMMENTS