आरोग्य टिप्स : युरिन इन्फेक्शनची (Urine infection) समस्या जास्त करून महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. अस्वच्छ पब्लिक टॉयलेटचा वापर करणं हे...
आरोग्य टिप्स : युरिन इन्फेक्शनची (Urine infection) समस्या जास्त करून महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. अस्वच्छ पब्लिक टॉयलेटचा वापर करणं हे या समस्येचे मुख्य कारण आहे. शरीराचं तापमान वाढणं, लघवी करताना दुखणं किंवा जळजळ होणं, वारंवार लघवीला जावं लागणं, रात्रीसुद्धा लघवीला जाणं, लघवीचा रंग फिकट किंवा हलका लाल होणं, लघवीला दुर्गंधी येणं, थंड-ताप येणे ही युरिन इन्फेक्शन मुख्य लक्षणं आहेत.
जाणून घ्या युरिन इन्फेक्शनवर घरगुती उपाय –
काकडी (Cucumber)-
काकडीतील अल्कलाईन तत्त्व आपल्याला शरीराला आतून थंडावा देतं आणि पचन क्रियाही सुधारतं. यामध्ये अनेक प्रकारची अँटीऑक्सीडंट्सही आढळतं. त्यामुळे लघवीच्या वेळी होणाऱ्या जळजळ आणि वेदना कमी होतात.
व्हिटॅमीन सी (Vitamin C)-
व्हिटॅमीन सीमुळे आपल्या लघवीतील ऍसिडची मात्रा वाढते आणि त्यामुळे बॅक्टेरियाचा नायनाट होतो. परिणामी इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
नारळपाणी (coconut water)-
नारळपाणी शरीर डीहायड्रेट ठेवत. त्यामुळं नारळपाणी पिल्याने लघवीमुळे होणारी जळजळ, वेदना आणि बैचेनी यांसारख्या समस्या दूर होतात.
आलं (Ginger)-
आल्यामधील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल तत्वांमुळे युरिन इन्फेक्शन दूर होतं.
धने (Coriander Seed)-
लघवीला होणारी जळजळ आणि वेदना दूर करण्यासाठी तुम्ही धन्याचा वापर करू शकता. कारण धने हे शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देतात. तसंच धन्याच्या दाण्यांमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणही असतात. जे आपल्याला युरिनरी इन्फेक्शनपासून वाचवतात आणि आपल्या शरीराचं तापमान स्थिर ठेवतात.
बेकिंग सोडा (Baking Soda)-
बेकिंग सोड्यातील अल्कलाईन तत्व लघवीतील ऍसिडचं प्रमाण वाढू देत नाहीत आणि शरीराचा पीएच स्तरही योग्य ठेवतात. बेकिंग सोड्याच्या सेवनाने तुम्हाला वारंवार लघवीला जाण्याच्या त्रासापासूही सुटका मिळते. तसंच वेदना आणि जळजळही दूर होते.
COMMENTS