सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : जागतिक महिला दिन ८ मार्च २०२३ रोजी सायंकाळी गोळेगाव येथील आमंत्रण कृषी पर्यटन केंद्र...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : जागतिक महिला दिन ८ मार्च २०२३ रोजी सायंकाळी गोळेगाव येथील आमंत्रण कृषी पर्यटन केंद्र येथे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव व डिसेंट फाउंडेशन जुन्नर पुणे यांच्या वतीने महिलांसाठी राष्ट्रीय नैसर्गिक अभियानांतर्गत नैसर्गिक शेती कार्यशाळा व जैविक निविष्ठा वाटप करण्यात आले. तसेच यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या पाच कर्तुत्वान महिलांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ श्री योगेश यादव यांनी महिलांना नैसर्गिक शेती व जैविक निविष्ठा तयार करणे व त्याचे नोंदणीकरण करण्याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. तर गृह विज्ञान विषय तज्ञ सौ निवेदिता शेटे यांनी महिलांना सेंद्रिय परसबाग व २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष साजरे केले जात असल्याने भरडधान्या विषयी देखील मार्गदर्शन केले.
यावेळी जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार साहेब, डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक व श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, डिसेंट फाउंडेशन चे प्रकल्प समन्वयक फकीर आतार, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल सौ अर्चना पवार , नंदनवन मतिमंद व दिव्यांग संस्थेच्या अध्यक्षा सौ रुपाली बोकरिया, रुपश्री महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ अश्विनी नवले, स्वामी समर्थ सेवा संस्थेच्या सौ प्रतिभा मेहेर, युट्युबर सौ कविता दातखिळे, जुन्नर पोलीस स्टेशनचे तसेच शिंगोटे साहेब व मनीषा ताम्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले.
तसेच श्रीमती अलकाताई शिवाजी माळी, सौ कविता राजेश बिडवई, सौ मनीषा गणेश काळे, सौ मंगल विठ्ठल बेळे व जुईली जयराम जाधव या पाच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित २०० महिलांना कृषी निविष्ठांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केले सूत्रसंचालन सौ प्राजक्ता मेहेर, सौ रेश्मा कोकणे व सौ ज्योती डोके यांनी केले. तर आभार विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सौ पल्लवी डोके यांनी मानले.
COMMENTS