क्राईमनामा Live : प्रसिध्द झी युवा वाहिनीवर दोन दिवसांपूर्वी किर्तनकार शंकर महाराज शेवाळे यांनी आपल्या किर्तनातून "आदिवासी नरभक्षक होते...
क्राईमनामा Live : प्रसिध्द झी युवा वाहिनीवर दोन दिवसांपूर्वी किर्तनकार शंकर महाराज शेवाळे यांनी आपल्या किर्तनातून "आदिवासी नरभक्षक होते" आदिवासी माणसे मारून खात होते अशा प्रकारचे बेताल वक्तव्य केले.
यामुळे तमाम आदिवासी बांधवांच्या या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या गेल्या आहेत.
सदर या बाबतीमध्ये जुन्नर तालुक्यातील आदिवासी समाजातील तरूण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत किर्तनकार शंकर महाराज शेवाळे यांच्याविरोधात जुन्नर पोलिस स्टेशन येथे अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक अधिनियम १९८९ नुसार शेवाळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन बिरसा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले.
जर यासंदर्भात योग्य कारवाई झाली नाही तर तमाम आदिवासी बांधव रस्त्यावर उतरून या बेताल महाराजांचा जाहिर निषेध करतील तरी प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी अमित घोगरे, पप्पू पारधी, विलास देवराम मेंगाळ, तुषार यमना वाळकोळी, गणेश अर्जुन उंडे व देवराम आवडा डावखर उपस्थित होते.
COMMENTS