पुणे : पत्नी व तिच्या तीन यारमुळे मी आत्महत्या करत आहे, असा मेसेज बहिणीला करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली आहे. ...
पुणे : पत्नी व तिच्या तीन यारमुळे मी आत्महत्या करत आहे, असा मेसेज बहिणीला करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कुणाल उर्फ राहुल संभाजी शिंदे (वय ४३) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
पत्नी तसेच तिच्या तीन मित्रांच्या त्रासाला कंटाळून कुणाल उर्फ राहुल संभाजी शिंदे यांनी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नील सुनील गजरे (वय २९, रा. गुरूवार पेठ, पुणे) याला अटक केली आहे. पत्नी, सचिन चांदणे व रितीक राज यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कुणाल याच्या आईने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणालचा विवाह २००५ साली झाला होता. ते फुलांचा व्यावसाय करत होता. कुणाल याची पत्नी व इतर आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. याबाबतची माहिती कुणाल यांना समजली होती. त्यामुळे त्यांनी संबंधितांना हे बंद करण्याबाबत सांगितले होते. हे बंद न केल्यास मी जिवाचे बरेवाईट करेल असेही सांगितले होते. तरीही त्यांच्यातील बोलणे सुरूच होते. शिवाय, पत्नीही मानसिक त्रास देत होती. पत्नीच्या वागण्याने कुणाल हे नैराश्यात गेले होते.
कुणाल यांनी आत्महत्या करण्यापुर्वी मोबाईलवरून व्हॉट्सअपवर सुसाईड नोट लिहीली. त्यात पत्नी व तिच्या तीन यारमुळे मी आत्महत्या करत आहे, असा मॅसेज बहिणीला केला. त्यानंतर आत्हमत्या केली. पोलिसांनी तत्काळ एकाला अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दर्शना शेलार या करत आहेत.
COMMENTS