सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : परमपूज्य गुरुमाऊली व आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय सतिशदादा मोट...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : परमपूज्य गुरुमाऊली व आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय सतिशदादा मोटेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने
श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) राजुरी आयोजित श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्सव व भव्य पालखी मिरवणूक सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात आणि टाळ मृदूंगाच्या गजरामध्ये स्वामीमय वातावरणात संपन्न झाला.
सकाळी भूपाळी आरतीने या सोहळ्यास सुरुवात झाली. त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर षोडशोपचार पूजा व सामुदायिक अभिषेक संपन्न झाला. पालखीचे स्वागत प्रत्येक दारा मध्ये सडा, रांगोळी व पायघड्या घालून करण्यात आले. उपस्थित सेवेकऱ्यांना सेवाकेंद्रातील प्रतिनिधीकडून मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर सुमारे १७५ सेवेकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये सामुदायिक हवनयुक्त स्वामीचरित्र पारायनामध्ये सहभाग घेतला. सायंकाळी पालखी आणि मिरवणूक सोहळ्या दरम्यान बालसंस्कार विभागातील बाल सेवेकऱ्यांनी दिंडोरीप्रणित मार्गातील गुरुप्रणालीचा सादर केलेला जिवंत देखावा अप्रतिम होता.
जयचंद बुवा जुंदरे, रामदास महाराज फावडे, विष्णू महाराज औटी, बबन महाराज पाटिल औटी, नंदाराम औटी, सुभाष फावडे, पोपट महाराज फावडे, पांडुरंग औटी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी टाळ आणि मृदूंगाच्या गजरात सादर केलेल्या हरिपाठाने उपस्थित सर्व भाविकांना मंत्रमुग्ध केले. महिला फुगड्या खेळत, काही डोक्यावर कलश, तुळस घेऊन अभंगा च्या तालावर नाचत होत्या.हा सुख सोहळा स्वर्गी नाही; पालखी सोहळ्यात सहभागी झालेले सर्वच भाग्यवान असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित स्वामी सेवेकऱ्यांनी दिली.
प्रसिद्ध गायक राहुल दुधवडे यांनी सादर केलेल्या स्वामीगीतांच्या तालावर भाविकांनी टाळ्यांचा ठेका धरला. श्री स्वामी समर्थ महाराजांची नैवेद्द आरती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये मोठ्या जल्लोषात घेण्यात आली. केंद्रातील प्रतिनिधिंनी स्वामी मार्गाविषयी व १८ विभागाचे मार्गदर्शन केले व बालसंस्कार वर्गाबद्दल माहिती दिली. मंदिरामध्ये महाप्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
या सोहळ्याचे नियोजन उत्तर पुणे जिल्हा प्रतिनिधी सारिका शेळके, केंद्रप्रमुख रामदास सरोदे, पंच कमिटी सदस्य राजेंद्र ताजवे, अविनाश पाटील औटी, अश्विनी शिंदे, संगीता शेळके, वैशाली राहाणे, आशिष शिंदे, मयूर शिंदे व राजुरीतील सेवेकऱ्यांनी केले. तसेच माजी जिल्हा परिषद स्नेहल शेळके, सरपंच प्रिया ताई हाडवळे, उपसरपंच माऊली शेठ शेळके, ग्रामपंचायत सदस्य सखाराम गाडेकर, रंगनाथ पाटिल औटी, गौरव घंगाळे, निर्मला ताई हाडवळे, रुपाली ताई औटी, सुप्रिया ताई औटी यांनी पालखी मिरवणुकी मध्ये सहभाग घेतला.
या कार्यक्रमासाठी राजुरीतील भाविक व ग्रामस्थांची लक्षनीय उपस्थिती होती.
COMMENTS